‘नुसत्या जमिनी ताब्यात घेऊन जमणार नाही तर कोणते उद्योग…’
सातारा :
जिल्ह्यातील कोरेगाव की माण तालुक्यात एम आय डी सी होणार यावरून आमदार जयकुमार गोरे, महेश शिंदे, आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात वादंग उठलेले असल्यामुळे काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांनी थेट शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पत्रकार परिषद घेऊन एम आय डी सी माण तालुक्यातच होणार असे सांगितले.
यावर शशिकांत शिंदे यांना पत्रकारांनी तुमची काय भूमिका असणार हे विचारले असता खरं तर एम आय डी सी कुठेही होऊ द्या परंतु त्यासाठी नुसतं जमिनीवर आरक्षण न टाकता त्या ठिकाणी कोणता व्यवसायिक आपली गुंतवणूक करायला तयार आहे, आणि कोणते उद्योग धंदे येतील त्यांना नेमकी किती जमीन लागणार आणि कशी लागणार हे पाहणं गरजेचं आहे . यासाठी जिल्हा स्तरावर आमदारांच्या आणि मंत्री मोहदयाच्या बैठक घेऊन चर्चा करुन मगच जमिनी ताब्यात घेणं गरजेचं असल्याचं मत शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.