google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

गोव्यातील शाळांत होत आहे मधुमेह जागरूकता कार्यक्रम

शालेय मुलांना मधुमेह, मधुमेहाचे अधिक चांगले व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैली यांबद्दल शिक्षण देण्यासाठी व जागरूकता निर्माण करण्यासाठी, पाच वर्षांपूर्वी, अत्यंत प्रगतीशील गोवा राज्याने सनोफी इंडिया लिमिटेड (एसआयएल) या कंपनीसोबत सार्वजनिक-खासगी सहयोग (पीपीपी) करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. सनोफी इंडिया कोनेक्सस सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशनच्या साथीने या कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण गोव्यात करत आहे.



सनोफी इंडियाची वैद्यकीय तज्ज्ञ व स्थानिक मधुमेहतज्ज्ञांची टीम, या सामाजिक प्रभाव सहयोगाच्या माध्यमातून, राज्याच्या आरोग्यसेवा कर्मचारी विभागातील कर्मचाऱ्यांना शिक्षण देत आहे तसेच त्यांना कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले जात आहे. हे कर्मचारी राष्ट्रीय बल स्वास्थ्य कार्यक्रमाचे (आरबीएसके) काम करतात. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी आरोग्य व स्वास्थ्य केंद्रांमध्ये काम करतात.


आजच्या तारखेपर्यंत गोव्यातील ४७० शाळांमधील १६७० शिक्षक व मुख्याध्यापक आणि १५०,००० विद्यार्थ्यांना मधुमेहाबद्दल शिक्षण देण्यात आले आहे. मधुमेहाचे प्रचलन व अधिक चांगले व्यवस्थापन तसेच निरोगी जीवनशैलीचे लाभ याबद्दल सर्वांना शिक्षण दिले जात आहे. याशिवाय, शालेय मुलांमधील टाइप वन मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण करणारा किड्स (किड्स अँड डायबेटिस इन स्कूल) हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राबवण्यासाठी, आरोग्यसेवा संचालनालयानेही सनोफी इंडियाशी भागीदारी केली आहे.


लहान मुलांना निरोगी जीवनशैली अवलंबण्यास प्रेरणा देण्याच्या दृष्टीने मधुमेहाबद्दल सातत्याने माहिती देत राहणे ही काळाची गरज आहे. विशेषत: आहारातील साखरेचा समावेश कमी करणे आणि नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. गोव्यातील लहान मुले व प्रौढांना, नवोन्मेषकारी, स्मरणीय आणि मजेशीर मार्गांनी, आरोग्यपूर्ण जीवनशैलीची निवड करण्यास प्रेरणा देण्याच्या उद्दिष्टाने साखर फ्री शुक्रवार, स्टेप आणि डायबथलॉन यांसारख्या संकल्पना उदयाला आल्या.

‘साखर फ्री शुक्रवार’ (एसएफएस) ही एक अनोखी पाककला स्पर्धा शालेय मुलांसाठी घेतली जाते. यात मुले साखरेच्या जागी अंजीर, खजूर, मध यांसारख्या आरोग्यपूर्ण पर्यायांचा वापर करणाऱ्या पाककृती तयार करतात. यामुळे शालेय मुलांमध्ये आरोग्यपूर्ण आहाराच्या सवयी बाणवण्यात मदत होते. एसएफएसचे हे तिसरे वर्ष आहे. यासाठी २४० शाळांमधून २०००हून अधिक अर्ज आले. त्यातील १०० अर्जांची निवड करण्यात आली. त्यातील १० जणांना अंतिम फेरीत सहभाग घेण्याची संधी मिळाली. स्टेप हा एक अॅपवर आधारित तंदुरुस्ती कार्यक्रम आहे. याद्वारे स्पर्धकांना दररोज १०,००० पावले चालण्याचे आवाहन केले जाते. यासाठी गोव्यातील २४० शाळांमधून २८,००० नोंदण्या झाल्या.


आज डायबथलॉन नावाचा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. डायबथलॉन ही दिवसभराची, वन-स्टॉप मॅराथॉन आहे. यात आहार, तंदुरुस्ती आणि अधिक चांगल्या मधुमेह व्यवस्थापनासाठी आवश्यक बाबी यांवर भर देण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्पर्धकांना रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासणे, मधुमेहाशी निगडित तथ्ये समजून घेणे यांचे महत्त्व पटवून दिले जाईल. त्याचप्रमाणे गैरसजम दूर केले जातील. आरोग्यपूर्ण आहार व व्यायामाच्या पर्यायांचा अनुभवही सहभागी सदस्यांना दिला जाईल. (संदर्भ: ICMR Study 2023 (NEW).pdf)

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!