पालकमंत्री शंभूराज देसाईनी तारळे भागातील नुकसानीची केली पाहणी
सातारा (महेश पवार) :
राज्यांचे उत्पादन शुल्क विभागाचे आणि सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकरयांच्या बांधावर जाऊन सोयाबीन, भुईमूग आणि भात शेतीचे पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान उभ्या पिकांचा पंचनामा लवकरात लवकर करुन घ्यावा अशा सुचनाही दिल्या मात्र याठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतातील पिके जर काढली असतील तर मदत मिळणार का ? असा सवाल उपस्थित केला.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी झालेल्या नुकसानीचा पुरावा म्हणजे फोटो असल्याशिवाय , मदत मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांना दरम्यान च्या काळातील फोटो असेल तरच मदत मिळणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं .
दरवेळी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतातील पिके काढता आली नाही यामुळे उभ्या पिकांना कोंब आल्यानं शेतीचे मोठे नुकसान झाले यामुळे शेतकरयांनी ऐन दिवाळीत दिवाळंनिघले असल्याची प्रतिक्रिया दिली . आम्हाला आता सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली .