google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्वॅग

सातारा  मतदारसंघातील मविआचे (MVA) उमेदवार श्रीनिवास पाटलांनी (Srinivas Patil) निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्याच्या (Satara) दौऱ्यावर असताना पाटलांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांच्याशी दोन हात कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, साताऱ्यात नव्या उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झालेले असतानाच शरद पवार यांनी मात्र सातारच्या भूमित थाटात कॉलर उडवली (Sharad Pawar Collar Video) आहे. कॉलर उडवून त्यांनी एका प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिलं आहे. पवारांच्या या कृतीचा व्हिडीओस सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

राज्यात महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी वाद असलेल्या जागांवर मविआ आपले उमेदवार जाहीर करू शकते. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली. श्रीनिवास पाटलांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. महायुतीकडून भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. उदयनराजे हे साताऱ्यातील बलशाली नेते आहेत. असे असताना श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यामुळे मविआसमोर पेच निर्माण झाला आहे. पण शरद पवार मात्र नेहमीप्रमाणे आपले राजकीय कौशल्य वापरून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांना चांगलाच खटाटोप करावा लागला. ते काही दिवस दिल्लीत मुक्कामी होते. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी मिळत नसल्यामुळे ते मध्यंतरी शरद पवार यांच्या संपर्कात होते, असा दावा केला जात होता. याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उदयनराजे यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. आमचे काहीही बोलणे झालेले नाही, असे पवार यांनी सांगितले. पुढे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही हातांनी थाटात कॉलर उडवली. पवारांनी कॉलर उडवताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनादेखील हसू आवरले नाही.

उदयनराजे भोसले हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जातात. ते भर सभेत, पत्रकार परिषदेत किंवा एखाद्या कार्यक्रमात थाटात कॉलर उडवतात. उदयनराजेंनी कॉलर उडवताच (Udyanraje Collar Video) प्रेक्षकांतून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतात. उदयनराजे हे नेहमीच बिनधास्त आणि स्टाईलने वावरत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात थाटात कॉलर उडविणारा नेता अशी उदयनराजे यांची ओळख आहे. मात्र याच उदयनराजेंच्या सातारा जिल्ह्यात जाऊन शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हातांनी कॉलर उडवली आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!