राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी बोलताना शिवाजी महाराजांचं इतिहासातील योगदान अधोरेखिले.
मुघल आणि परकीय आक्रमकांनी देशातील हिंदू देवीदेवतांची मंदिरे उद्ध्वस्त केली मात्र शिवाजी महाराजांच्या रूपाने या दुष्टचक्राला आळा बसला. महाराजांनी कित्येक मंदिरांची पुनर्बांधणी केली. आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या वास्तू राजांनी उभारल्या.
या संदर्भात शहा यांनी गोव्यात नुकत्याच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या सप्तकोटेश्वर मंदिराचा उल्लेख केला. गोव्यातील राजदैवत श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे.
छत्रपतींमुळेच गोव्याचे सप्तकोटेश्वर मंदिर पुन्हा उभे राहिले असा उल्लेख शहा यांनी आपल्या भाषणात केला. पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला.