google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘सोनी’ने आणले तब्बल १२ तास चालणारे ‘इन्झोन बड्स’

सोनीने आपल्या नवीन ‘इन्झोन बड्स’  (INZONE Buds) ची घोषणा केली आहे. वापरकर्त्याने गेम जिंकावा यासाठी सोनीने खास तयार केलेल्या प्रसिद्ध ध्वनी तंत्रज्ञानासह खऱ्या अर्थाने ज्यास वायरलेस म्हणता येईल असे हे नवीन गेमिंग ईयर बड्स आहेत. वैयक्तिक कम्प्युटर (पीसी), मोबाइल आणि कन्सोल गेमप्ले यांच्यावर गेम खेळताना ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) व्यक्तिगत ध्वनी, १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ आणि कमी विलंब यांच्यामुळे एक भान हरपून टाकणारा असा गेमिंग अनुभव देते.

जगातील एक सुप्रसिद्ध आणि अग्रगण्य ईस्पोर्ट्स संघटना फनॅटिकच्या (Fnatic) सहभागीदारीतून ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) चा जन्म झाला होता. फनॅटिक (Fnatic) यंदा साल २०२४ मध्ये आपल्या कारकि‍र्दीची २० वर्षे साजरी करणार आहे आणि त्यांनी यावर्षी वॅलोरंट चॅम्पियन्स टूरमध्ये (VALORANT Champions Tour) लागोपाठ आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले. अधिक सुधारित ध्वनीसह ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) तुमचा कम्प्युटरवरील किंवा प्लेस्टेशनवरील गेमिंग अनुभव नेहमीप्रमाणे समृद्ध करीत राहील.

  • आजूबाजूचा गोंगाट सक्रियपणे काढून टाकणारे तंत्रज्ञान आणि वैयक्तीकृत अवकाशीय ध्वनी तुम्हाला सर्वात पुढे राहायला मदत करते:

‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) ने गेमिंगमधील ध्वनीपद्धतीची जणू पुनर्व्याख्याच केली आहे. आजूबाजूचा गोंगाट सक्रियपणे काढून टाकणारे तंत्रज्ञान आणि वैयक्तीकृत अवकाशीय ध्वनी तुम्हाला तुमच्या गेममध्ये सर्वात पुढे ठेवते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजूबाजूचा अगदी कमीतकमी आवाज आणि अचूक असे दिशात्मक संकेत असलेल्या जगात स्वतःला अगदी हरवून घ्या. या क्षेत्रातील अग्रगण्य तंत्रज्ञान आणि उपयुक्त रचनेसह हे वायरलेस ईअर बड्स खेळाच्या क्षेत्रातील तुमची प्रतिस्पर्धात्मक शक्ती वृद्धिंगत करून तुम्हाला अतुलनीय व विलक्षण असे ध्वनी अनुभव देतात.

  • या उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात जास्त म्हणजे सलग १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ असलेले व खऱ्या अर्थाने ज्यास वायरलेस म्हणता येतील असे गेमिंग ईयर बड्स:

‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) त्यांच्या वायरलेस   हेडसेटसह गेमिंग क्षेत्रातील ध्वनी अनुभव जणू पुन्हा परिभाषित करतात आणि या उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात जास्त म्हणजे सलग १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ असल्याचा मानही पटकावतात. कमी प्रमाणात  बॅटरी लागणारे एल १ प्रोसेसरने (L1 processor) चालणारे हे ईअर बड्स कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्हाला तुमच्या खेळाचा आनंद जास्त वेळ घेऊ देते. शिवाय, अगदी कमी वेळात त्वरित चार्जिंगच्या सुविधेमुळे;  केवळ पाच मिनिटे चार्ज करून जवळपास एक तास चार्जिंग, वापरकर्त्यांना अखंड खेळ खेळता येते. अशापद्धतीने ही अप्रतिम बॅटरी गेम खेळणाऱ्यांना खेळाडूंना अधिक कालावधीसाठी, अडथळ्यांशिवाय सलग व मुग्ध करणारा खेळ खेळण्यास देते.

  • गेम खेळताना जास्त आरामदायी अनुभवासाठी ईअर बड्सचा कानाशी कमीतकमी संपर्क:

‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) ची रचना अशी केलेली आहे की, या बड्सचा कानाशी कमीतकमी संपर्क येतो, जेणेकरून वापरकर्ते जास्त वेळ खेळत असले तरी त्यांच्या कानास त्रास होत नाही व अस्वस्थ न होता ते अधिक वेळ खेळू शकतात. वजनाने हलके आणि खऱ्या अर्थाने वायरलेस असलेले हे  ईअर बड्स घातले आहेत हेच वापरकर्ते विसरून जातात आणि त्यास एकूणच आरामदायी अनुभव मिळतो. उत्साही खेळाडूंच्या गरजा पूर्ण करत ही विचारशील रचना जास्त वेळासाठी, आरामदायी व भान विसरवून टाकणारे गेमिंग अनुभव देते.

  • ‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) केवळ युएसबी टाइप-सी डोंगल आणि ब्लुटूथ एलई ऑडिओ कनेक्शनद्वारे (USB Type-C dongle and Bluetooth LE Audio connection) २.४ गिगाहर्टस वायर लेस कनेक्शनला (4 GHz wireless connection) समर्थित आहे (codec:LC3):

केवळ युएसबी टाइप-सी डोंगल कनेक्शनद्वारे (USB Type-C dongle) २.४ गिगाहर्टस वायर लेस कनेक्शनला (2.4 GHz wireless connection) समर्थन देते आणि गेम खेळताना कनेक्टिव्हिटी मध्ये कमी विलंब (latency) लागण्याची हमी देते. शिवाय, ते कोडेक एल सी ३ (codec:LC3) वापरुन ब्लुटूथ एलई ऑडिओ (Bluetooth LE Audio) ला पूरक आहे. जे ऊर्जा कार्यक्षम वायरलेस प्रदर्शनाला अनुकूलित करते. विशेष म्हणजे एसबीसी (SBC), एएसी (AAC), एपीटीएक्स (aptX) आणि एलडीएसी  (LDAC) हे आणि अन्य पारंपरिक ब्लुटूथ कोडेक ना हे सुसंगत नाही. हे ईअर बड्स खास समृद्ध अश्या ध्वनी अनुभवासाठी विशेष गेमिंग कनेक्टीव्हीटीवरच लक्ष केंद्रित करतात.

  • आरर्टीफिशिअल इंटेलिजन्स (AI) सहाय्यीत मायक्रोफोन ऐन कृतीमध्ये मग्न असतानादेखील स्पष्ट ऐकण्यास मदत करतात

‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) मधील आरर्टीफिशिअल इंटेलिजन्स (AI) सहाय्यीत मायक्रोफोन वापरकर्त्याला गेम खेळताना ऐन कृतीमध्ये मग्न असतानादेखील स्पष्ट ऐकू येण्याची हमी देतो. ५०० दशलक्ष पेक्षा जास्त आवाजांच्या नमुन्यांमधून तयार केलेल्या प्रगत एआय डीएनएन (AI DNN) अल्गोरिदमचे एकत्रीकरण करून हे वापरकर्त्याच्या आवाजाला ओळखते आणि त्यास वेगळे करून तो आवाज वाढवते. त्यामुळे आजूबाजूच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर वापरकर्त्याचा आवाज ठळकपणे समोर येतो. या तंत्रज्ञानामुळे खेळातील संवाद अधिक समृद्ध व स्पष्ट होत असल्याने खेळाडूंना गेम खेळताना आवश्यक आवाज अपवादा‍त्मक अश्या स्पष्टतेने ऐकू येतात. परिणामतः हे तंत्रज्ञान एक मग्न करणारे आकर्षक असे गेम खेळण्याचे अनुभव प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!