25 ऑक्टोबर रोजी होणार ‘थोडें बोल्ड थोडें ओल्ड’चे प्रकाशन
पणजी :
खांडोळा-माशेल येथील शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि सहित प्रकाशन संयुक्त विद्यमाने तरुण कवयित्री पृथ्वी नायक यांनी लिहिलेल्या ‘थोडें बोल्ड थोडें ओल्ड’ या कोंकणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन, गुरुवार, 25 ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
गोव्याचे कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या आकस्मिक निधनामुळे १६ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेला सदर पुस्तक प्रकाशन समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. तो आता, २५ ऑक्टोबर रोजी होत आहे.
सहित प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक गोवा कोंकणी अकादेमीच्या “पयलो चंवर” योजने अंतर्गत सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे संचालक भूषण सावईकर प्रमुख पाहुणे असतील. तर प्रसिद्ध कोंकणी लेखिका हेमा नायक या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. गोवा कोंकणी अकादेमीचे उपाध्यक्ष रमेश घाडी हे विशेष पाहुणे असतील, तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूर्णकला सामंत यांची उपस्थिती असणार आहे. तसेच डॉ. पुर्वा वस्त पुस्तकावर भाष्य करतील.
गोव्यातील नवलेखकांच्या सर्जनशील वृत्तीला आणि कोंकणी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी सदर प्रकाशन कार्यक्रमात सर्व साहित्यप्रेमींना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सहित प्रकाशनच्यावतीने किशोर अर्जुन यांनी केले आहे.

