बंगळुरू :
दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या क्षेत्रातील जागतिक आघाडीची वाहन निर्माता टीव्हीएस मोटर कंपनी (TVSM) आपल्या प्रीमियम मोटरसायकल ब्रँड TVS Apache साठी दोन महत्त्वपूर्ण टप्पे गाठण्याचा उत्सव साजरा करत आहे. या ब्रँडचा 20 वा वर्धापन दिन असून जगभरातील 6 दशलक्ष ग्राहकांहून अधिक ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. अत्याधुनिक रेसिंग तंत्रज्ञानाने विकसित आणि टीव्हीएस रेसिंगच्या चॅम्पियनशिप परंपरेने प्रेरित, TVS Apache 60 हून अधिक देशांमध्ये वेगाने वाढणाऱ्या स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँडपैकी एक बनला आहे. गेल्या दोन दशकांपासून, या मोटरसायकलने तरुणाईला आणि मोटरसायकलप्रेमींना वेग, अचूकता आणि उच्च कार्यक्षमता यांचे अद्वितीय मिश्रण सादर केले आहे.
या महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणु म्हणाले, “गेल्या 20 वर्षांमध्ये आमच्यावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या आणि अत्यंत उत्साही अशा 6 दशलक्षाहून अधिक TVS Apache रायडर्सचे आम्ही मनःपूर्वक ऋणी आहोत. त्यांचे वेग आणि उत्कृष्टतेवरील प्रेम TVS Apache ला जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँड्सपैकी एक बनवण्यास कारणीभूत ठरले आहे. हा टप्पा म्हणजे आमचे अभियंते, डिझाइनर्स, उत्पादन संघ, डीलर्स, पुरवठादार आणि भागीदार अशा TVSM कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विजय असून ते दररोज नावीन्यतेच्या सीमा पुढे नेत आहेत. TVS Apache ची चीरकालीन यशोगाथा अत्याधुनिक रेसिंग तंत्रज्ञान, अचूक अभियांत्रिकी आणि अप्रतिम कामगिरी यांचा मिलाफ आहे. ही मोटरसायकल म्हणजे मोटरसायकलिंगचा रोमांच ज्यांचा जणू श्वास आहे अशा नव्या पिढीतील रायडर्ससाठी प्रेरणादायक आहे.”
रेसिंग कामगिरी आणि विश्वासाच्या पायावर उभारलेली मोटरसायकल
TVS Apache ही TVS Racing च्या 43 वर्षांच्या वारशातून प्रेरित असून, ती उच्च-कार्यक्षमता, चपळता, नाविन्यपूर्णता आणि रायडिंगच्या मूळ तत्त्वांचे प्रतिनिधित्व करते. एवढ्या वर्षात जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये, जसे की आशिया (बांगलादेश, नेपाळ), LATAM (कोलंबिया, ग्वाटेमाला, मेक्सिको, होंडुरास) आणि आफ्रिका (गिनी क्षेत्र) मध्ये Apache मोटरसायकल्स प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. रेसिंग DNA मुळे ही मोटरसायकल जगभरातील कामगिरीची पुर्नव्याख्या करत आहे. याशिवाय, युरोप (इटली) मध्येही Apache चे स्थान वेगाने वाढत आहे.
• TVS Apache ची 2005 मधील सुरूवात ब्रँडसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून त्यामध्ये Apache 150 हे पहिले मॉडेल सादर करण्यात आले.
• ही मोटरसायकल भारतातील वाढत्या कामगिरी केंद्रित मोटरसायकल्सच्या मागणीसाठी खास डिझाइन करण्यात आली होती आणि त्यामुळे टीव्हीएसने प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रवेश केला
• फॅक्टरी कस्टमायझेशन (Build-To-Order) BTO पर्याय सादर करण्यासाठी TVS Apache हा भारतातील पहिला दुचाकी ब्रँड आहे.
• जगभरातील 6 दशलक्ष रेसिंगप्रेमींचा समुदाय हा या ब्रँडवरील अपार विश्वासाचे प्रमाण आहे.
TVS Apache: रेसिंग-प्रेरित अचूकता
• TVS Racing च्या ‘Track to Road’ तत्त्वज्ञानावर आधारित, Apache मोटरसायकल्समध्ये वेग, चपळता, अचूकता आणि उच्च कार्यक्षमता आहे.
• डिझाइनपासून ते तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक पैलू रेसट्रॅक अनुभवाने घडवला गेला आहे.
• रेसिंग सार्वत्रिकीकरणाच्या वचनबद्धतेसह TVS Apache जागतिक दर्जाच्या मशीन आणि रायडर्सचा उत्साही समुदाय निर्माण करत आहे.
TVS Apache: नाविन्यपूर्णता आणि जागतिक विस्तार
• TVS Apache हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँड्सपैकी एक बनला आहे.
• हे दोन प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे: Apache RR (रेस-केंद्रित) आणि Apache RTR (स्ट्रीट परफॉर्मन्स) दोन्ही मालिकांमध्ये TVS Racing च्या मोटरस्पोर्ट परंपरेची छाप असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च कार्यक्षमता पुरवितात.
• TVS Apache ने बहुविध सेगमेंट-फर्स्ट तंत्रज्ञान सादर करत कामगिरी, सुरक्षितता आणि नाविन्यपूर्णता क्षेत्रात आघाडी घेतली आहे.
कामगिरी सुरक्षितता तंत्रज्ञान
फ्युएल इंजेक्शन ड्युअल चॅनेल ABS SmartXConnect™
राईड मोड्स ड्युअल डिस्क ब्रेक क्रूझ कंट्रोल
अॅडजस्टेबल सस्पेन्शन रेस-ट्यूनड डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल क्लायमेट कंट्रोल सीट
स्लिपर क्लच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रतिक्रिया देताना टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रीमियम बिझनेसचे प्रमुख श्री. विमल सुम्बली म्हणाले, “TVS Apache ने प्रीमियम मोटरसायकलिंगच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आमचे धोरण नेहमीच रेसिंग मधील उत्कृष्टता आणि नाविन्य यावर आधारित राहिले आहे. गेल्या 20 वर्षांत, Apache ने परफॉर्मन्स मोटरसायकलिंगची पुर्नव्याख्या केली आहे आणि Apache Owners Group (AOG) द्वारे जगभरातील उत्साही रायडर्सना एकत्र आणले आहे. 60 लाख ग्राहकांचा टप्पा पार करणे हे आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या दिशेने घेतलेल्या ध्येयधोरणांचे तसेच ग्राहकांना अतुलनीय अनुभव देण्याच्या बांधिलकीचे फळ आहे. प्रीमियम मोटरसायकलिंगच्या भविष्याला आकार देण्यासाठी आम्ही भविष्यातही कामगिरी, तंत्रज्ञान आणि रायडिंग कम्युनिटीशी दृढ नाते निर्माण करण्याकरता कटिबद्ध आहोत. Apache ही केवळ मोटरसायकल नाही—ती एक चळवळ, एक परंपरा आणि रेसिंगप्रेमींच्या समुदायाचा एक भाग आहे.”
Apache Owners Group (AOG) मध्ये 300,000 हून अधिक आंतरराष्ट्रीयरित्या जोडलेले रायडर्स असून भन्नाट कामगिरी आणि रायडिंगचा थरार यावर भरभरून प्रेम करणारी समविचारी मंडळी या जागतिक समुदायात एकत्र आली आहेत. Apache ब्रँडने ग्राहकांना इव्हेंट्स, ट्रॅक डेज, आणि रायडर्स मिट-अप्स मध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कंपनी आणि ग्राहकांमधील नाते अधिक दृढ झाले आहे. Apache च्या पुढील प्रवासात, कंपनी रायडर्सच्या स्वप्नांना नवे पंख देईल आणि त्यांना एक अतुलनीय रेसिंग अनुभव सादर करेल. त्यातून गतीचा थरार आणि अचूकतेची शक्ती दिसून येईल!
TVS APACHE: 6 दशलक्ष ग्राहक आणि 20 वर्षांची रेसिंग परंपरा
~ रेसिंग क्षेत्रात क्रांती घडवलेली मोटरसायकल 2025 मध्ये उत्कृष्टतेची
दोन दशके साजरी करत आहे ~
बंगळुरू, 3 एप्रिल 2025: दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या क्षेत्रातील जागतिक आघाडीची वाहन निर्माता टीव्हीएस मोटर कंपनी (TVSM) आपल्या प्रीमियम मोटरसायकल ब्रँड TVS Apache साठी दोन महत्त्वपूर्ण टप्पे गाठण्याचा उत्सव साजरा करत आहे. या ब्रँडचा 20 वा वर्धापन दिन असून जगभरातील 6 दशलक्ष ग्राहकांहून अधिक ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. अत्याधुनिक रेसिंग तंत्रज्ञानाने विकसित आणि टीव्हीएस रेसिंगच्या चॅम्पियनशिप परंपरेने प्रेरित, TVS Apache 60 हून अधिक देशांमध्ये वेगाने वाढणाऱ्या स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँडपैकी एक बनला आहे. गेल्या दोन दशकांपासून, या मोटरसायकलने तरुणाईला आणि मोटरसायकलप्रेमींना वेग, अचूकता आणि उच्च कार्यक्षमता यांचे अद्वितीय मिश्रण सादर केले आहे.