google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

उदयनराजेंना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यात…

सातारा (महेश पवार) :

उदयनराजेच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खासदार उदयनराजेंना पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, कंदी पेढे आणि तलवार भेट दिली. या वेळी उदयनराजेंनी तलवार हवेत उंचावल्यानंतर जोरदार जल्लोष करण्यात आला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना ‘महाराजसाहेब, मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही तलवार आहे. जपून ठेवा, संग्रही ठेवा. वार करू नका, ‘असे सांगितले आणि ते जोरात हसले.

या वेळी उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले, आमदार महेश शिंदे, सुनील काटकर, काका धुमाळ,पंकज चव्हाण, गीतांजली कदम, रंजना रावत, श्रीकांत आंबेकर, सुजाता राजे महाडिक, संदीप शिंदे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!