शिंदे सरकार बचावलं, उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरला मुद्दा…
नवी दिल्ली:
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज पाच न्यायमूर्तींंच्या घटनापीठाने निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांनी हा निकाल वाचून दाखवला. या निर्णयात महाराष्ट्रातील सरकार बचावले असून, शिंदे-फडणवीस सरकार सुरक्षित झाले आहे.
तसेच, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर, ते सरकार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केला असता असेही कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिंदे सरकार बचावले आहे.
न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे :
– शिंदे गटाच्या भरत गोवावलेंची प्रतोद म्हणून निवड बेकायदेशीर
– राज्यपालांची कृती बेकायदेशीर
– राज्यपालांनी राजकीय भूमिका घेणे चुकीचे
– पक्षांतर्गत वादासाठी बहुमत चाचणी वापरणे चुकीचे
– अविश्वास ठराव न आणता फक्त एका पत्रावर राज्यपालांनी बहूमत चाचणी बोलवली