‘जनतेच्या पैशावर मला ट्रिप करायची नाही’
Vijai Sardesai : गोवा सरकारच्या वतीने गुजरात मध्ये सुप्रसाशन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यावर विजय सरदेसाई यांनी सडकून टीका केली आहे. जनतेचा पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही असे म्हणत या अभ्यास दौऱ्याच्या शिष्टमंडळातून माझे नाव वगळावे अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सावंत व त्यांचे मंत्री शहाजहान राजवटीसारखे गोवा सरकार चालवत आहेत. हे मंत्री गुजरात मध्ये सुप्रसाशन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर जात आहेत ही मोठी हास्यास्पद बाब आहे अशी टिका सरदेसाईंनी सरकारवर केली.
सरदेसाई म्हणाले, सरकारने 9 आमदारांचा 19 ते 21 फेब्रुवारीला अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात पहिलेच नाव शहाजहानाचे आहे. ज्या मंत्र्याने निविदा न काढता कला अकादमी दुरुस्तीचे काम करून कोट्यवधीचा गैरव्यवहार केला त्यांच्या बरोबर गुजरात मध्ये अभ्यास दौऱ्यावर जायचे.
19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान गोव्यात कार्निव्हल महोत्सव सुरु असतो यावेळी आम्ही गुजरातमध्ये फिरायचे हे कशासाठी? या दौऱ्यावर जायची माझी ईच्छा नाही. त्यामुळे या मंत्र्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या यादीतून माझे नाव वगळावे.
म्हादई आणि कोळसा प्रश्नी सरकारने लक्ष देवून ही समस्या सोडवावी. जनतेचा पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही असे सरदेसाई यांनी सांगितले.