‘कुंकळ्ळीच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी निश्चित केली ‘ही’ उद्दिष्टे’
कुंकळ्ळी :
कुंकळ्ळी मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत कोणताही विकास झालेला नाही. मागील दहा वर्षात संपुर्णपणे दुर्लक्षीत झालेल्या अनेक समस्या प्राध्यानक्रमाने दूर करणे आवश्यक आहे. कुंकळ्ळीला पुढे नेण्यासाठी आम्ही आता अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित केली आहेत, असे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले.
कुंकळ्ळी मतदारसंघातील नवनिर्वाचित पंचायत सदस्यांसह सार्वजनीक बांधकाम, जलसंसाधन, वीज आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
आम्ही योग्य पाठपुरावा करून सर्व कामे वेळेत पूर्ण करू. सर्व पंचायत सदस्यांनी कुंकळ्ळीच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून एकसंघ राहुन काम करावे, असे युरी आलेमाव म्हणाले.
माकाझान, गिरदोली, चांदर, आंबावली, पारोडा व बाळ्ळी येथील बहुतेक सरपंच, उपसरपंच व पंचायत सदस्यांनी या बैठकीला उपस्थित राहून आपापल्या पंचायत क्षेत्रातील लोकांच्या विविध समस्या मांडल्या. आम्ही प्राधान्यक्रम ठरवू आणि कामे हाती घेऊ, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
सार्वजनीक बांधकाम, जलसंपदा विभाग, वीज आणि कृषी खात्याच्या सरकारी अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित असलेल्या आमच्या पंचायत सदस्यांनी उपस्थित केलेल्या विवीध मुद्द्यांची व समस्यांची दखल घेतली आहे. मी आता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी बोलून विकासकामे लवकर मार्गी लागतील याची खातरजमा करीन, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
माझ्या मतदारसंघातील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी सर्व संबंधितांशी वेळोवेळी बैठका घेईन. विकासकामे राबविताना सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे मी नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो, असे युरी आलेमाव म्हणाले.