या संदर्भात चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष महेश देशपांडे यांनी दिग्दर्शक व निर्मिती व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधितांकडून भेटण्यास तसेच फोन उचलण्यास टाळाटाळ करत असल्याचे देशपांडे यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले . यासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले . यामुळे परळी खोऱ्यात सुरू असलेल्या पारु मालिकेच्या शूटिंगचा बाजार आता उठणार की काय अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे .
आता झी मराठीवरील पारू या मालिकेच्या कलाकारांवर झालेल्या अन्यायाबाबत न्याय मागण्याची वेळ आल्याने आता यासंदर्भात झी मराठी काय पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून याप्रकरणी झालेल्या आरोपांबाबत संबंधित व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळु शकली नाही .