‘…म्हणून वेदांता-फॉस्ककॉन प्रकल्प गुजरातला पळवला’
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप व नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारवही हल्लाबोल केला. आ. चव्हाण पुढे म्हणाले, गुजरातचे या प्रकल्पासाठी कुठेही नाव नसताना हा प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपामुळे गेला. डबल इंजिन असलेले सरकार राज्यात आल्याने त्यांच्यातील कोणी काही बोलत नाही. त्यामुळे या सरकारची किंमत महाराष्ट्र राज्याला मोजावी लागली.
महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याने, उद्योगपतीने अहमदाबाद बुलेट ट्रेन करावी अशी मागणी केली होती. बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे. या बुलेट ट्रेनचा 40 ते 45 टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलला आहे. अहमदाबादच्या लोकांना मुंबईला यायचे ठिक आहे, त्यांना विमानसेवा आहे. मग एवढी महागडी बुलेट ट्रेन पालघर, ठाणे या भागातून जाणार आहे. या ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे, हे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी द्यावी. मोदींच्या हट्टापायी हा प्रकल्प झालेला आहे. केवळ गुजरातचे महत्व वाढवायचे अन् मुंबईचे महत्व कमी करायचा हा एक प्रयत्न आहे. मुंबईतील बीकेसी येथील अत्यंत मोक्याची व हजारो कोटीची जागा या बुलेट ट्रेनसाठी दिलेली आहे. तेथे आता नविन कंपन्या, बिझनेस येणार नाही, या सर्वाचा परिणाम केवळ मुंबईचे महत्व कमी करायचे हा आहे. तेव्हा महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनी मतदारांना सांगावे, वित्तीय सेवा अहमदाबादला गेल्याने मुंबईला किती फायदा झाला.