google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

राष्ट्रीय सिनेपुरस्कारांवर दाक्षिणात्य सिनेमांचे वर्चस्व…

नवी दिल्ली:

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा कऱण्यात आली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला नव्हता. मात्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी १० सदस्यीय परीक्षक मंडळाचे नेतृत्व चित्रपट निर्माता विपूल शहा यांनी केले.


इतर सदस्यांमध्ये धरम गुलाटी, जीएस भास्कर, श्रीलेखा मुखर्जी, ए कार्तिकराजा, व्हीएन आदित्य, संजीव रतन, विजी तंपी, एस थंगदुरई आणि निशिगंधा यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये तामीळ, मल्याळम सिनेमांनी आपली छाप पाडली. यात सूर्याच्या ‘सोराराई पोतरु’ला (Soorarai Pottru) सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. सूर्याला (Suriya) ‘सोराराई पोतरु’ साठी आणि अजय देवगन (Ajay Devgan) याला ‘तानाजी : द अनसंग वाॅरिअर’ साठी ( Tanhaji : The Unsung Warrior) उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे :

1. सर्वोत्कृष्ट अभिनेता – अजय देवगण (तान्हाजी), सूर्या (सोरारई पोटरु)
2. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – तुलसीदास (आशुतोष गोवारीकर)
3. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, तानाजी : द अनसंग वॉरियर, निर्माता- अजय देवगण, दिग्दर्शक- ओम राऊत
4. सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – सोरारई पोरु (तामिळ)
5. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरु)
6. सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोज मुन्तशिर (सायना)
7. सर्वोत्कृष्ट बुक ऑन सिनेमा – द लॉन्गेस्ट किस – लेखक किश्वर देसाई
8. सर्वोत्कृष्ट म्युझिक डायरेक्शन – विशाल भारद्वाज (1232 किलोमीटर)
9. विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म
– जून (मराठी), अभिनेता – सिदार्थ मेनन
– गोदाकाठ (मराठी) आणि अवांचित (मराठी), अभिनेता- किशोर कदम
10. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, गोष्ट एका पैठणीची दिग्दर्शक – शांतनू रोडे
11. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, राहुल देशपांडे, चित्रपट – मी वसंतराव
12. सर्वोत्कृष्ट बालकलाकार (मराठी चित्रपट) अनिश गोसावी, चित्रपट- टकटक आणि आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर, चित्रपट- सुमी
13. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, फनरल (मराठी), विवेक दुबे
14. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : सुमी, दिग्दर्शक – अमोल गोळे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!