महावितरणच्या ‘त्या’ ठेकेदारांवर होणार कारवाई
सातारा (महेश पवार) :
महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून जवळपास सोळाशे कामगारांच्या पगारातून कपात करुन कामगारांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणार्या ठेकेदारांच्या विरोधात सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित तक्रारीवर तात्काळ कारवाई चे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण सातारा Lcb कडे आल्यानंतर , या प्रकरणी पोलीसांना मोठे धागेदोरे सापडले असून लवकरच संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणात काही राजकीय व्यक्ती नी देखील पैशाची देवाणघेवाण केल्याची माहिती समोर आली असून , यामुळे कंत्राटी कामगारांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणार्या ठेकेदार व ज्या अधिकार्यानी टेबला खालून मलिदा खाल्ला त्यांच्यावर सुध्दा कारवाई चार ससेमिरा लागणार असल्याची माहिती मिळाली असून या कारवाईच्या भिंती ने संबंधितांना ४४० चा झटका बसल्याची चर्चा सध्या तरी महावितरण मध्ये सुरू आहे.