अर्थमत/ टेक्नॉलॉजी

धोनी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा ब्रँड अॅम्बेसेडर

नवी दिल्ली : जगातील चौथ्या क्रमांकाचा ज्वेलरी रिटेलर असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह (एमएस) धोनी यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या दीर्घकालीन भागीदारीद्वारे कंपनीच्या ‘द रिस्पॉन्सिबल ज्वेलर’ या संकल्पनेला अधिक बळ मिळणार आहे.


पारदर्शकता, विश्वास, नैतिक व्यावसायिक पद्धती आणि ग्राहक-केंद्रित सेवा या मूल्यांवर आधारित असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही घोषणा केली आहे. कंपनीच्या ‘मालाबार प्रॉमिसेस’ अंतर्गत १०० टक्के BIS हॉलमार्क दागिने, नैसर्गिक हिऱ्यांची २८ गुणवत्ता तपासणी, पारदर्शक किंमत, हमीशीर बायबॅक, आजीवन देखभाल, मोफत विमा आणि जबाबदार सोर्सिंग यांसारख्या सुविधा दिल्या जातात.


या मोहिमेचा प्रचार दूरदर्शन, मुद्रित माध्यमे, डिजिटल, सोशल मीडिया, रेडिओ, चित्रपटगृहे, आउटडोअर जाहिराती आणि रिटेल नेटवर्कद्वारे केला जाणार असून, जगभरातील कंपनीच्या ४५० हून अधिक स्टोअर्समधून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.


मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “आजचे ग्राहक केवळ दर्जेदार दागिन्यांपेक्षा पारदर्शकता, विश्वास आणि उत्तरदायित्वालाही महत्त्व देतात. एमएस धोनी यांची मूल्ये आमच्या तत्त्वांशी सुसंगत असून, त्यांच्या सहकार्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल.”


एमएस धोनी म्हणाले, “विश्वास हा सातत्यपूर्ण कृतीतून मिळतो. मालाबार गोल्ड अँड डायमंड्सची पारदर्शकता आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी मला भावली. या भागीदारीद्वारे ग्राहकांना आत्मविश्वासाने आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊन दागिने खरेदी करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न असेल.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!