गोवासिनेनामा 

‘अस्वस्थ वाटतंय’… नाना पाटेकरांचा पहाटे २.३० वाजता मित्राला मेसेज…

पणजी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अखेरच्या काही तासांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मणिपाल रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी पहाटे सुमारे २.३० वाजता आपल्या मित्राला आपण अस्वस्थ असल्याचा संदेश पाठवला होता. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने मित्राला हा संदेश लगेच पाहता आला नाही.


मित्राला संदेशाची माहिती मिळाल्यानंतर त्याने नाना पाटेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि पहाटे सुमारे ४ वाजता त्यांच्या गोव्यातील निवासस्थानी पोहोचला. त्यावेळी नाना यांना घाम फुटला होता आणि ते हळूहळू बेशुद्ध होत असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या केअरटेकरला माहिती देण्यात आली आणि रुग्णवाहिका बोलावण्यात आली.


रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय पथकाने नाना यांच्या घरी पोहोचताच त्यांच्यावर सीपीआर आणि कार्डियाक मसाज सुरू केला. त्यांना उपचार सुरू असतानाच पहाटे सुमारे ४.२० ते ४.३० वाजता मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत ते प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले; मात्र त्यांना वाचवता आले नाही.



नाना पाटेकर यांना पहाटे ५.२० वाजता मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती उपलब्ध वृत्तांमध्ये देण्यात आली आहे. रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगितले आहे. मात्र मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.


नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्यासोबत कुटुंबीय उपस्थित नव्हते; मित्र आणि केअरटेकर त्यांच्या जवळ होते, अशी माहितीही डॉ. साळकर यांनी दिली आहे.


७५ वर्षीय नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे आणि स्वतंत्र शैलीमुळे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!