अर्थमत/ टेक्नॉलॉजी

गोदरेजची स्मार्ट लॉकर्स आणि व्हिडिओ डोअर फोनमध्ये फेस रेकग्निशन सुविधा

नवी दिल्ली: देशात घरगुती लॉकर उत्पादन विक्रेता बाजारपेठेत आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदरेज ग्रुपच्या सिक्युरिटी बिझनेसने दोन नवीन उत्पादने लाँच केली आहेत. यामध्ये ‘एनएक्स प्रो एनक्रिप्ट होम लॉकर’ आणि ‘सीथ्रू थर्ड-आय व्हिडिओ डोअर फोन’चा समावेश आहे. या नवीन व्हिडिओ डोअर फोनमध्ये दरवाजासमोर उभ्या असलेल्या माणसाचा चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यामुळे सोसायट्यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या माणसाचा चेहरादेखील ओळखता येईल. त्यामुळे घरासह सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील माणसाची माहिती मिळणे सोपे होईल. आजच्या आधुनिक ग्राहकांना तंत्रज्ञानाशी मिळत्याजुळत्या सोयीसुविधा हव्या असतात. याच गरजा लक्षात घेत कंपनीने ही उत्पादने तयार केली आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने घर तसेच परिसरातील सुरक्षा व्यवस्था भक्कम होण्यास हातभार लागणार आहे.

ग्राहकांच्या सुरक्षितेत कोणतीही कमतरता राहू नये, याकरिता सहज उपलब्ध सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे याकडे गोदरज कंपनी प्राधान्य देते. आजच्या पिढीला विनाअडथळा सोयीसुविधा देणारी सुरक्षा व्यवस्था हवी आहे. ग्राहकांची हीच मानसिकता ध्यानात घेत गोदरेजची नवी उत्पादने घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावतात. आता ग्राहक घराचे कुलुप उघडण्यासाठी किल्ली, कोडवर्ड्स या उत्पादनांचा वापर करणे टाळतात. आजच्या काळात चेह-याची ओळख पटवून घरात प्रवेश मिळण्याकडे ग्राहकांचा कल असतो. गोदरेजमुळे घराची आणि सोसायट्यांची सुरक्षेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

गोदरेज कंपनी ही देशातील आघाडीची कंपनी म्हणून सर्वपरिचित आहे. ग्राहकांच्या सेवेकरिता कंपनीने सदैव नवनवीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आहे. घराच्या लॉक सुरक्षा व्यवस्थेत दरवाज्यासमोरील माणसाचा चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान अवगत केल्याने कंपनीने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला आहे. यामुळे घराच्या सुरक्षेची पकड मजबूत होते. ही सुविधा वैयक्तिक पातळीवर कोणालाही त्रासदायक ठरत नाही.

‘एनएक्स प्रो एनक्रिप्ट होम लॉकर’ आधुनिक कुटुंबाच्या गरजा पूर्ण करते. याच माणसाचा चेहरा ओळखण्यासह, बोटांचे ठसे, डिजिटल पिन अशा तीनही सुविधा उपलब्ध होतात. लॉकरमधील १२८-बिट एईएस एनक्रिप्शनद्वारे चेह-याचे तपशील सुरक्षित राखले जातात. रात्रीच्या अंधारातही दरवाजासमोर उभ्या राहिलेल्या माणसाच्या चेह-याची पडताळणी केली जाते. हे उत्पादन सुरक्षेबाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. या लॉकरमध्ये १९ जणांचे चेहरे, ४९ जणांचे बोटांचे ठसे आणि १९ युजर कोड सेव्ह करण्याची सोय आहे. त्यामुळे घरातील मौल्यावान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबांसाठी हा खात्रीशीर पर्याय आहे.

या दोन्ही नवीन उत्पादनांच्या माध्यमातून, गोदरेजने घरासह, सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक मानकांची स्थापना केली आहे. आजच्या काळात सुरक्षिची काळजी घेणारी उत्पादने ही वापरण्यास सोपी असावीत, ही मागणी लावून धरतात. ही मागणी गोदरेजची दोन्ही उत्पादने पूर्ण करतात. परिणामी, गोदरेजच्या स्मार्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना घराच्या सुरक्षिततेबाबत चिंता करण्याची गरज नाही. त्यांना आपले घर सुरक्षित राखता येईल. तणावमुक्त जीवन जगता येईल.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स बिझनेस विभागाचे बिझनेस प्रमुख श्री. पुष्कर गोखले यांनी दोन नव्या उत्पादनांच्या लाँचबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही नेहमीच ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेतो. ग्राहकांना उत्पादन वापराचा अनुभव चांगला यावा, याकरिता आम्ही प्रयत्नशील असतो. सुरक्षितेत कोणत्याही तडजोडीविना वापरण्यास सोपी आणि आधुनिक यंत्रणा असावी, अशी ग्राहकांची मागणी असते. चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होत केल्याने घरातील माणसांना पूर्ण सुरक्षा मिळते. ‘एनएक्स प्रो एनक्रिप्ट’ आणि ‘सीथ्रू थर्ड आय’च्या माध्यमातून आम्ही ही आधुनिक सुविधा वैयक्तिक घरांपासून ते मोठ्या सोसायट्यांपर्यंत उपलब्ध करून देत आहोत. यामुळे आधुनिक भारतीय ग्राहकांना भविष्यातील सर्वोत्तम सुरक्षा अनुभव देण्याची आमची बांधिलकी दृढ झाली आहे.”

या नवीन उत्पादनांमुळे वैयक्तिक वापरकर्ते आणि रहिवासी सोसायट्यांच्या सुरक्षिततेच्या प्रक्रियेत गोदरेजच्या उत्पादनांची मागणी वाढू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर नवी उत्पादने उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांनाही भक्कम पाठिंबा मिळाला आहे. स्मार्ट सुरक्षा आणि रोजच्या वापरातील सोय यांचा उत्तम मेळ साधला जातो. यामुळे केवळ घराची सुरक्षा गरजेपुरती मर्यादित न राहता ग्राहकाभिमुळे बनली आहे.

‘एनएक्स प्रो एनक्रिप्ट’ होम लॉकरची किंमत ४७ हजार ४९९ रुपयांपासून उपलब्ध होते. हे लॉकर देशभरातील गोदरेजच्या दुकानांमध्ये, डीलर्स आणि ऑनलाईन विक्री माध्यमांतूनही खरेदी करता येईल. ‘सीथ्रू थर्ड-आय’ मल्टि अपार्टमेंट व्हिडिओ कंपनीच्या अधिकृत विक्रेच्यांकडे व टीमकडून उपलब्ध होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!