राज्याचा कोविड पॉझिटिव्ह दर आज 9.14%
पणजी :
राज्यात कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे, 1,225 नमुन्यांपैकी 112 नमुने कोविडसाठी पॉझिटिव्ह आढळल्याने, गोव्याचा कोविड पॉझिटिव्ह दर आज 9.14% इतका आहे. तर 67 रूग्ण बरे झाले आसून, सक्रिय रूग्णांचा 600 चा आकडा ओलांडला आहे. सध्या राज्यात हॉस्पिटलायझेशनची संख्या – 0, डिस्चार्जची संख्या – 0,आहे तर, मृत्यूची संख्या – 0 आहे.
आरोग्य खात्याने नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मागील काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे निदर्शनात येते. मात्र, आता परत रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
दरम्यान, राज्यात मान्सूनलाही सुरुवात झाली असून मागील दोन दिवस जाेरदार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात 12 करोना रुग्ण सक्रिय होते. पण गेल्या आठवड्यापासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 614 वर पोहोचला आहे.