‘असा’ जिंकला शिंदे – फडणवीसांनी विश्वासदर्शक ठराव
मुंबई:
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने आज ( दि. ४ ) विश्वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने १६४ सदस्यांनी मतदान केले. शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला.
रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले होते. त्यांना १६४ मते तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती.
या निवडणुकीत नार्वेकरांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल, असे व्हीपमध्ये म्हटले होते. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करून शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.
दरम्यान, शिंदे गटाला शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता देत विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेला धक्का दिला होता. या निर्णयामुळे सेनेच्या १६ आमदारांना सोमवारी बहुमत चाचणीवेळी शिंदे गटाचा व्हिप मान्य करून सरकारच्या बाजूने मतदान करावे लागेल. त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात मतदान केल्यास आदित्य ठाकरे यांच्यासह सेना आमदारांची आमदारकीच धोक्यात येऊ शकते. व्हिपविरोधात मतदान केले म्हणून विधानसभा अध्यक्ष त्यांना निलंबित करू शकतात. अर्थात त्यानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. तसे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते.