google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘अधिवेशनाचा कालावधी कमी करुन पंचायत निवडणुकाही भाजप पुढे ढकलणार’

पणजी :
कॉंग्रेस आमदाराना तोंड देण्याचे धाडस नसल्याने तसेच पंचायत निवडणुकातील प्रभाग आरक्षणातील घोळाने भयभीत झालेले डबल इंजिन भाजप सरकार आता अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करुन, नागरीकांना न्यायालयात जाण्यास प्रवृत्त करुन पंचायत निवडणुकाही पुढे ढकलणार असा गौप्यस्फट कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे उपनेते व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केला आहे.

विधानसभा अधिवेशनात आम्ही मांडलेल्या विवीध तारांकीत प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर घाबरट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पुढे काय वाढुन ठेवले आहे याची कल्पना आली असेल. त्यामुळे सलग २५ दिवस विरोधकांना सामोरे जावे लागणार असल्याने मुख्यमंत्र्यांचे अवसान आताच गळाले आहे असा टोला संकल्प आमोणकर यांनी हाणला.

आमचे केपेंचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी थ्री लिनीयर प्रकल्प रद्द करण्याचे व सदर प्रकल्पाविरूद्ध लढा देणाऱ्या आंदोलकांवरील खटले मागे घ्यावेत म्हणुन दाखल केलेला खासगी ठराव चर्चेसाठी क्रमांकीत झाल्यानंतर भाजपला हादरा बसला असेल. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचा कुंकळ्ळी लढ्यावरील ठरावही क्रमांकीत झाल्याने प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजप सरकारला चपराक बसली आहे. सरकारला घेरण्यासाठी आम्ही योग्य रणनिती आखली असुन आम्ही नवीन असल्याने उत्कृष्ट कामगीरी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे संकल्प आमोणकर यांनी सांगितले.

भाजपने पंचायत निवडणुक प्रभाग आरक्षणात घातलेल्या जाणिवपुर्वक घोळाने केवळ विरोधकच नव्हे तर भाजप कार्यकर्तेही संतापले असुन, लोकांच्या रागाचे परिवर्तन भाजप पुरस्कृत उमेदवारांच्या पराभवात होईल असा दावाही संकल्प आमोणकर यांनी केला.

भाजप सरकार आता आपली पत राखण्यासाठी विधानसभा अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करणार असुन, जाणिवपुर्वक ओबिसी प्रभाग आरक्षणात घोळ घालुन पंचायत निवडणुकासुद्धा लांबणीवर टाकणार असल्याचे संकल्प आमोणकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!