केळघर घाटात रेगंडीजवळ भूस्खलन
मेढा (महेश पवार)
गत दोन दिवसापाऊस पाऊसाची संताधार जावलीत वाढली आहे . केळघर घाटातील रेंगडी गावाजवळ भुसखल झाल्याने केळघर घाट वाहतुकीतरीता पाऊसाळ्यात पुन्हा असुरक्षित झाला असल्याचे भुसखलनाने समोर आले आहे . केळघर घाटातील रेगडी गावचा परीसर भुगर्भ शास्त्रज्ञानी असुरक्षित असल्याचे लेखी जिल्हाअधिकारी सातारा यांना कळवले आहे . मात्र अद्याप रेंगडी गावच्या भुसखलानावर कोणतीच उपाययोजना सार्वजनिक बाधकाम विभागाकडुन करण्यात आली नसल्याचे जळजळीत सत्य समोर आले आहे.
केळघर घाटातील रस्त्याचे बाधकाम करत असताना रेंगडी गावाच्य् हद्गीमध्ये भुसंकलनाची सुचना भुगर्भ शास्त्रज्ञानी देवुनही रोड वे सोल्युशन इडिया कपनीने फक्त वडाप काम करत धोकादायर केळघर घाटात भुसखलाविरोधात कोणतीच उपाययोजना न केल्याने केळघर घाट पाऊसातील वाहतुक धोकादायक झाली आहे .
सार्वजनिक बाधकाम विभाग व महसुल विभाग जावलीकडुन केळघर घाटातील वाहतुकीचा कोणताच सुरक्षित आरखडा नसल्याने केऌघर घाटातील रेगडी गावानजीक पाऊसामध्ये वारवार भुसखल होत असल्याच्या घटना घडत अयल्याचे केळघर घाटात सतत दिसत आहे .प्रशासनाच्या महमंद तुघलगी कारभाराचा फटका सर्वसामान्य प्रवाशाना केळघर घाटात मुठीत जीव घेवुन जावे लागत असलाचे चित्र केळघर घाटातील वारवार होणार्या भुसखलनावरुन लपुन राहीले नाही हे मात्र नक्की.