
पी व्ही सिंधूने कोरले सिंगापूर ओपनवर नाव
नवी दिल्ली:
भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. तिने चिनच्या वांग झी यीला पराभूत करत सिंगापूर ओपनच्या पदकावर आपलं नाव कोरलं आहे. पीव्ही सिंधूने रविवारी सिंगापूर ओपन २०२२ मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आहे.
तिने सेमी फायनलमध्ये जपानच्या साईना कावाकामीचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ अशा सरळ सेटमध्ये जिंकला होता. यावर्षी सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० टायटल जिंकली आहेत. त्यानंतर आता सिंगापूर ओपनचं तिसरं पदक आपल्या नावावर केलं आहे.