शंभूराज देसाईना कॅबिनेट; पाटणमध्ये जल्लोष
सातारा (अभयकुमार देशमुख):
पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांनी आज मंत्रीमंडळ शपथ समारोहात शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतली.
शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमध्ये शंभूराज देसाई यांची अग्रणी भूमिका राहिली आहे. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील मानले जातात. आज शपथ विधी होताच मुंबई, कारखाना स्थल,तारळे आदी भागात फटाके फोडून घोषणा देत कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला.
शंभूराज देसाई हे महाविकस आघाडीत राज्यमंत्री होते आता ते नविन सरकार मध्ये कैबिनेट मंत्री असणार आहेत. शंभूराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई हे यशवंतराव चव्हाण मंत्रीमंडळात वजनदार मंत्री म्हणून ओळखले जायचे. आता शंभूराज देसाई यांना कैबिनेट मंत्री पद मिळाल्याने तालुक्यातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.