‘म्हणून येणार कास पठारावर इलेक्ट्रिक बस’
सातारा :
जिल्ह्यातील वर्ल्ड हेरिटेज पठारावर पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करून कास पठारावर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यटन विकास मंडळामार्फत पी एम पी एल मार्फत दहा बसेस सुरू करण्यासंदर्भात , आज कास पठारावर येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा पाहण्यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी दौरा केला.
यावेळी सातारा कास रस्त्यावर असलेल्या गणेश खिंड परिसरातील पठारावर पर्यटकांना गाड्या पार्किंग करुन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बस ची पर्यटकांना मोफत बस सेवा सुरु करण्यासंदर्भात पाहणी दौरा झाला असून लवकरच ही सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रमत शी बोलतांना सांगितले.