उंब्रज येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
कराड:
उंब्रज ता.कराड येथील महामार्गालगत असणारे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम शनिवार दि.२२ रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास कटावणीने उचकटून रोकड रक्कम लंपास करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र च्या कंट्रोल विभागाने पहाटेच्या सुमारास दिलेल्या माहितीमुळे रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पोहोचता आले सायरणच्या आवाजामुळे चोरटे काळोख्या अंधारात पसार झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दिवाळीच्या सलग सुट्टीमुळे एटीएम मध्ये मोठ्या प्रमाणात रोकड भरणा केला असल्याचा अंदाज चोरट्यांनी लावला असल्याने उंब्रज येथील एटीएम वर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु एटीएम मॉनिटरिंग एजन्सीच्या सतर्कतेमुळे पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर झाले याबाबत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले असून याबाबत अधिक तपास उंब्रज पोलीस करत आहेत