गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे अटकेत
कराड (अभयकुमार देशमुख) :
शहर पोलीस ठाणे हद्दीत मुजावर कॉलणी या परिसरात पिस्टल मधून फायरिंग झाली. त्याबाबत शहारुख मुल्ला यांनी निशिकांत शिंदे आणि परशुराम करवले यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तक्रार दिल्यानंतर कराड शहर पो.ठाणे येथे आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांर्भिय ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने तपास करून आरोपी निशिकांत शिंदे यास कराड येथून आणि तडीपार गुंड परशुराम करवले यास आटपाडी ता.खानापूर जि.सांगली येथून ताब्यात घेतले. घेवून अटक करण्यात आलेले होते. दरम्यान आरोपींकडे गुन्ह्यात वापरलेल्या एक लाख रुपये किंमतीच्या 02 पिस्टल, पुंगळी आणि चाकु जप्त करण्यात आले.
सदरचा गुन्हा हा घरासमोर बसण्याच्या कारणावरून झाल्याचा तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
पुढील तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि अमित बाबर, सपोनि तब्बसुम शादीवान, सफौ सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंखे, कुलदीप कोळी, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, सागर भोसले, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, माणिक थोरात, सोनाली मोहिते यांनी केलेली आहे.