रणबीर – आलियाला झाले कन्यारत्न
मुंबई :
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी इवल्याश्या परीने जन्म घेतलाय. आलिया भट्टने तिच्या संपूर्ण गरोदरपणात काम केले आहे. यादरम्यान आलिया अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत तिने चक्क चित्रपटाचे प्रमोशन देखील केले. गरोदरपणात आलिया सतत काम करताना दिसली. ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी आलिया सतत फिरत होती. आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते आता त्यांच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड आतुर आहेत. आलिया आई झाल्याची बातमी कळाल्यापासून चाहते सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि बाळाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आता चाहते आलियाच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
आलियाची प्रेग्नेंसी न्यूज कळाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साह होता. आलियाच्या प्रेग्नेंसीदरम्यानच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिले. आलियाचे गोदभराईचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. ज्यामध्ये आलियाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता. आलिया सतत आपल्या प्रेग्नेंसीची अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत होती.
रविवारी सकाळी 7 वाजता रणबीर कपूर आलियाला घेऊन हाॅस्पिटलमध्ये पोहचला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यामुळे एक अंदाज लावला जात होता की, आजच आलिया बाळाला जन्म देणार. आलिया आणि रणबीरनंतर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आलियाची सासू अर्थात नीतू कपूरही पोहचल्या होत्या.