सातारा
दानवेंच्या विरोधात उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक
सातारा (महेश पवार) :
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या संदर्भात ऐकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे समर्थकांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावानजीक नॅशनल हायवेवर टायर पेटवून रस्ता बंद केला. आणि दानवे विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर माहिती मिळताच सातारा तालुका ट्रफीक पोलीसांनी हायवेवर पेटलेले टायर बाजूला करत रस्ता मोकळा केला.