‘हा’ शेअर देणार आता बोनस देखील…
Rhetan TMT या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. इंट्रा-डेवर नुकताच हा शेअर सुमारे 4 टक्क्यांच्या वाढीसह, बीएसईवर 469.50 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. कंपनीने बोनस आणि स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे ज्यामुळे गुंतवणूकदार त्याचे शेअर्स खरेदी करत आहेत. सध्या या कंपनीचे शेअर्स बीएसईवर 454 रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याची मार्केट कॅप 964.75 कोटी रुपये आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येकी 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असणाऱ्या इक्विटी शेअर्सचे प्रत्येकी 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या 10 इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, प्रत्येक चार इक्विटी शेअर्समागे 11 बोनस शेअर्स देण्याचा ठरावही बोर्डाने मंजूर केला आहे. कंपनीने 21 डिसेंबरला एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली.
Rhetan TMT चा 56 कोटी रुपयांचा आयपीओ 22-25 ऑगस्ट 2022 दरम्यान आला होता. त्याचे शेअर्स गुंतवणूकदारांना 70 रुपयांच्या किमतीत जारी करण्यात आले आणि 5 सप्टेंबरला लिस्टिंगच्या दिवशी तो 72 रुपयांवर गेला आणि 66.50 रुपयांवर बंद झाला. 13 सप्टेंबरला 50.60 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता, पण नंतर मजबूत खरेदीचा कल दिसून आला आणि आता तो 454 रुपयांवर आहे. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांच्या भांडवलात आतापर्यंत 548 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विक्रमी नीचांकी पातळीपासून ते सुमारे 710 टक्क्यांनी मजबूत झाले आहे.
Rhetan TMT बांधकामात वापरल्या जाणार्या टीएमटी आणि राउंड बारचे उत्पादन करते. त्यांचा प्लांट गुजरातमध्ये आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 13.44 लाख रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वाढून 2.35 कोटी रुपये झाला. दुसरीकडे, कंपनीच्या महसुलात किरकोळ वाढ झाली आणि ती 52.13 कोटींवरून 67.03 कोटींवर गेली