google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘सनबर्न’ला ध्वनी प्रदूषणप्रकरणी कोर्टाचा दणका

वागातोर येथे सुरू असलेल्या सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी 55 डेसिबल्सपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक प्रमाणात संगीत वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याने आयोजकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाने तक्रार देऊन संबंधित पोलिसांनी चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने देत दणका दिला. राजेश सिनारी यांनी सादर केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी येत्या 3 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.

ध्वनिप्रदुषणासंदर्भात तातडीने जनहित याचिका सादर करण्यात आली. त्यावरील सुनावणीवेळी खंडपीठाने सनबर्न ईडीएम आयोजकांसह सरकारी यंत्रणा व हणजूण पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. परवानगीपेक्षा कर्कश आवाजाने संगीत वाजवूनही कारवाई न केल्याने पोलिसांना जाब विचारला. वेळ व संगीत वाजवण्याची मर्यादा, देण्यात आलेल्या परवानगी याची माहिती असलेला फलक प्रवेशद्वाराच्या ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले.

28 ते 30 डिसेंबर दरम्यान झालेल्या सनबर्न ईडीएम संगीताच्या आवाजाचा नोंद केलेला डेटा पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने 28 आणि 29रोजी ईडीएम संगीताचा आवाज वेळोवेळी मोजत असताना काहीवेळा अधिक वाढत होता त्यावेळी आयोजकांना संकेत दिले जात होते तरी काही वेळाने हा आवाज वाढत होता अशी माहिती खंडपीठाला देण्यात आली.

ध्वनी प्रदूषणविरोधात हणजूणस्थित राजेश सिनारी यांनी ही जनहित याचिका सादर केली आहे. त्यामध्ये राज्य सरकारसह पर्यटन खाते, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव, जीसीझेडएमए सदस्य सचिव, म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी, हणजूण पोलिस निरीक्षक व मे. स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा. लि. याना प्रतिवादी करण्यात आले आहे. या कर्कश ध्वनीमुळे सनबर्न ईडीएम महोत्सव सुरू असलेल्या आजुबाजूच्या वस्तीतील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असा दावा याचिकादाराने केला आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!