सातारा
माजी आमदारांच्या घरामागे सापडला महिलेचा मृतदेह
सातारा (महेश पवार) :
सातारा वाढे गावच्या परिसरात माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंद घराच्या मागील बाजूस मातीच्या ढिगार्याखाली महिलेचा मृतदेह सातारा पोलिसांना सापडला.
दरम्यान, संपूर्ण घटनेचा सातारा पोलीस तपास करत असून नेमका हा मृतदेह कोणाचा? नेमका हा प्रकार कधी घडला याबाबत पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी बघ्याची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून परिसरात खळबळ माजली आहे.