‘टोलनाके चालवणारे खासदार राजघराण्यात कसे काय जन्माला आले?’
सातारा (महेश पवार) :
अजिंक्य उद्योग समूहाबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी वाजवलेले तुणतुणे त्यांनी बंद करावे . अजिंक्यतारा उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल साडेतीनशे कोटी रुपयांची आहे या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून अनेकांचे संसार उभी राहिले आहेत अशी एखादी संस्था उदयनराजे यांनी उभी केली आहे काय ? खासदारांचे टोलनाक्याचे अर्थ कारण संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे अशी टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शिकवू नये असा राजकीय टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.
पत्रकारांशी येथील सुरुची निवासस्थानात संवाद साधताना शिवेंद्रसिंह राजे पुढे म्हणाले, गेल्या पाच सहा वर्षाच्या वाटचालीत उदयनराजे हे सातत्याने अजिंक्य उद्योग समूहावर टीका करत आहेत . मात्र अजिंक्य उद्योग समूह हा साडेतीनशे कोटीचा नेटवर्थ असलेला कारखाना आहे शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसाच्या आत जमा केली जातात सूतगिरणी मध्ये 200 कामगार कामाला असून तीन कोटी रुपये पगाराला आणि बोनसला वीस लाख रुपये दिले जातात त्या माध्यमातून सातारा तालुक्याच्या अर्थकारणामध्ये अजिंक्य उद्योग समूहाचे मोठा हातभार आहे असे असताना आपण काहीच केलेले नाही त्यामुळे आपण अजिंक्य उद्योग समूहाच्या भ्रष्टाचाराचे जे तुंणतुणे वाजवत आहात ते आपण बंद करावे.
सातारा शहरासाठी डीपीडीसी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हद्द वाढीच्या दृष्टीने मंजूर कामांचा पाठपुरावा आणि त्याला निधीची उपलब्धता ही मी सातत्याने केली आहे .उदयनराजे यांच्या एकाही विकास कामाचे श्रेय घेण्याचा मी कधीही प्रयत्न केलेला नाही आणि मला त्याची गरजही नाही, मात्र साताऱ्यात नगरपालिका सत्ताधारी सातारा विकास आघाडीने धुवून खाल्ली गेल्या पाच वर्षात त्यांना एकही मोठा प्रोजेक्ट पूर्ण करता आलेला नाही . काही लोकांना मिशा काढील भुवया काढील असे डायलॉग मारण्यापलीकडे काही काम उरलेले नाही ते नेहमीच समोरासमोर एकदा या आणि होऊन जाऊ द्या असं म्हणत असतात पण समोरासमोर येऊन करायचे काय तुमचा पाच वर्षाचा भ्रष्टाचार कारभाराचा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच तुम्ही भावनिक राजकारण करत आहात ते दिवस आता संपलेले आहेत सातारा पालिका भ्रष्ट मुक्त करण्यासाठी आम्ही आता तयारीला लागलेला आहोत सातारकर लवकरच उदयनराजे आणि त्यांच्या आघाडीला नारळ देणार यात शंका नाही.
जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी आपली राजकीय ताकद नव्हती तेव्हा आपण माझ्याच केबिनमध्ये बसला होतात, अजिंक्यतारा बँकेच्या ठेवी सुरक्षितपणे मर्ज झालेल्या बँकेत हस्तांतरित करण्यात आल्या कुणाच्याही ठेवीला धक्का लागला नाही एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार झालेला नाही हे आधी उदयनराजे यांनी समजून घ्यावे आणि मग डायलॉग बाजी करावी समजत नसेल तर एखादा शहाणा स्वीय सहाय्यक ठेवून त्याच्याकडे ते समजून घ्यावे अशी कोपरखळी शिवेंद्रसिंह राजे यांनी मारली.
सातारा पालिकेतला भ्रष्टाचार सादर करणे उघडे डोळ्यांनी बघितलेला आहे भुयारी गटार योजनेची काय परिस्थिती आहे वेळप्रसंगी अनेक योजना मधला भ्रष्टाचार आम्ही दाखवून देऊ अजिंक्यतारा कारखाना एका हंगामात 213 कोटी रुपयांचा पेमेंट देतो ऍडव्हान्स पोटी 40 कोटी दिले जातात असे असताना सातारा तालुक्याचे जे अर्थकारण फिरतेय ते पैसे फिरून साताऱ्याच्याच बाजारपेठेत येतात त्यामुळे अशी एखादी कोणती संस्था उदयनराजे उभी केली आहे आणि किती जणांचे संसार मार्गी लावले आहेत याचा त्यांनी दाखला द्यावा . उदयनराजे यांनी टीका करणारी अशी कशी माणसे राजघराण्यात जन्माला आली असा टोला शिवनेरी यांना लगावला होता त्याचाही शिवेंद्रसिंह राजे यांनी जोरदार समाचार घेतला.
ते म्हणाले दुसरा करत असताना त्याच्यामध्ये माझा हिस्सा किती हे यांच्या राजकारणाचे सूत्र आहे टोल नाके चालवणारे राजघराण्यात कसे काय जन्माला आले ? टोल नाक्यावर हाणामिरी दादागिरी वसुली असले प्रकार कोणाच्या सांगण्यावरून घडत होते हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे टोलनाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्ही काय करावे आणि काय करू नये हे आम्हाला शिकवू नये ही त्या आगामी काळात पालिका आम्ही भ्रष्ट मुक्त करणार आपल्या भावनिक राजकारणाचे दिवस आता संपलेले आहेत
बाजार समितीच्या आखाड्यात आपल्याकडे युतीचा काय प्रस्ताव आहे काय असा विचारला असता शिवेंद्रसिंह राजे म्हणाले उदयनराजे भोसले यांना वगळून आमचे स्वतंत्र पॅनलचे शंभर टक्के प्रयत्न असून त्याची तयारी झाली आहे आणि आम्ही निवडणुकीला पूर्णपणे सज्ज आहोत स्थानिक परिस्थिती बघून योग्य निर्णय घेतला जाईल पण खासदारांशी कोणतेही परिस्थितीत तडजोड होणार नाही निगडी आणि वर्णे या ठिकाणी जागा एमआयडीसीसाठी हस्तांतरित करण्याचे सुतोवाच शिवेंद्रसिंहराजे यांनी केले यासंदर्भातील नुकतीच एक बैठक मुंबईत झाली असून आगामी काळात येथील ज्या कोरडवाहू जमिनी आहेत तेथे एमआयडीसी उभी करण्याचे आमचा मनोदय आहे या माध्यमातून साताऱ्याच्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल असे ते म्हणाले .लिंब येथे बाजार समितीच्या प्रशस्त इमारतीसाठी १७ एकर जागा मंजूर झाल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले .