मागील काही दिवसांपासून विमानांमध्ये विविध घटना घडल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना कोचीहून बंगळुरूमार्गे भोपाळला जाणाऱ्या विमानात घडली आहे. गोवा जाणाऱ्या प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
प्रवाशाने 21 वर्षीय एअर होस्टेसला अयोग्यरित्या स्पर्श केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. सोमवारी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
वृत्तानुसार, विमान सोमवारी सकाळी 6.06 वाजता कोचीहून भोपाळला निघाले तेव्हा केआयए येथे थांबले. दरम्यान, येथे गोव्याला जायचे म्हणून एक प्रवासी विमानात बसला. यादरम्यान या प्रवाशाने एअर होस्टेसला घाणेरडा स्पर्श केला. असे या वृत्तात म्हटले आहे.
प्रवाशाला गोव्याला जाण्यासाठी फ्लाइट बदलावी लागेल असे सांगण्यासाठी एअर होस्टेस त्याच्याकडे गेली असता, प्रवासी त्याच्या जागी नव्हता. दरम्यान, तो पुन्हा त्या जागी आला त्यावेळी एअर होस्टेस त्याचठिकाणी थांबली असताना प्रवाशांना तिला घाणेरडा स्पर्श केला. अशी तक्रार एअर होस्टेसने केली आहे.
दरम्यान, सदर गैरप्रकार महिलेच्या लक्षात आल्यावर तिने याबाबत तक्रार केली व विमानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली. प्रकरणाची तात्काळ दखल घेत संशयित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले व त्याला त्याच ठिकाणी उतरण्यात आले.
ताब्यात घेतलेला संशयित हा केरळमधील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक असल्याचे बातमीत म्हटले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.