उत्तर गोव्यात आता कोणताही रस्ता खोदता येणार नाही
पणजी:
उत्तर गोव्यातील रस्त्यांवर आता अजिबात खोदकाम करता येणार नाही. तसे आदेशच जिल्हाधिकारी मामू हागे यांनी जारी केले आहेत.
यामध्ये उत्तर गोवा जिल्ह्यातील राष्ट्रीय-राज्य महामार्गांसह, जिल्हा मार्ग इत्यादी रस्त्यांचा समावेश आहे.
1 जुनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकूण 60 दिवस हा आदेश लागू असणार आहे. कोणत्याही प्रकारचे खोदकाम करता येणार नाही, रस्ते कापता येणार नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातील जून आणि जुलै या दोन महिन्या जिल्ह्यात कोणत्याही रस्त्यावर खोदकाम करता येणार नाही.
अर्थात यातून सरकारी विभागांना वगळले आहे. वीज विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल, तातडीने बदलावयाच्या वीज वाहिन्या, टेलिकम्युनिकेशन्स केबल्स अशा कामांना यातून मुभा असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एखादे काम सुरू असेल तर त्यालाही मुभा असणार आहे. दरम्यान, इतरांनी कुणी या आदेशाचा भंग केला तर संबंधिताला कायद्यानुसार शिक्षा करण्याचे अधिकार प्रशासनाला असणार आहेत.
DM #NorthGoa, Imposes ban on digging & Cutting of all types of roads, including National Highways, State Highways, Major District roads, Road-Shoulders, lanes, thoroughfares etc. during the monsoons from 01/06/2023 pic.twitter.com/pKRnM0heVq
— DIP Goa (@dip_goa) May 25, 2023