Virat Kohli Record : वर्ल्डकप फायनलमध्ये कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम
ICC World Cup 2023 Final : आयसीसी वर्ल्डकप 2023 च्या फायनल मॅचमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) झुंजार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह विराट कोहलीने आणखी विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्या (Cricket World Cup 2023) उपांत्य (Semi Final) आणि अंतिम (CWC Final) सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटचा कोहलीचा समावेश झाला आहे.
विराट कोहली अशी कामगिरी करणारा जगातील सातवा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी 1979 साली इंग्लंडचा मायकेल ब्रेअरली, 1987 साली ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून, 1992 साली पाकिस्तानचा जावेद मियांदाद, 1996 साली श्रीलंकेचा अरविंद डी सिल्वा, 2015 साली न्यूझीलंडचा ग्रँट इलियट, 2015 साली ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंनी उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली. यावेळी 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा जलवा
या विश्वचषकात किंग कोहलीची बॅट चांगलीच तळपळली. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला आणि एकदिवसीय सामन्यात 50 शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला. याशिवाय त्याने या विश्वचषकात सर्वाधिक धावाही केल्या. त्याच्या खात्यात 765 धावा जमा झाल्या आहेत. मात्र, आज कोहली अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 63 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. या अर्धशतकासह विराट कोहली विश्वचषकाच्या इतिहासात एकाच स्पर्धेत 750 हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. हादेखील एक विक्रमच आहे.