IPL 2024 Auction: स्टार्कला लागली ऐतिहासिक 24.75 कोटींची बोली
IPL 2024 Auction, Mitchell Starc
दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये इंडियन प्रीमीयर लीग २०२४ स्पर्धेसाठी मंगळवारी (१९ डिसेंबर) लिलाव होत आहे. या लिलावात अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू उतरले आहेत. यातील एक मिचेल स्टार्कही होता. दरम्यान, त्याच्या बोलीने इतिहास रचला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी IPL 2024 Auction गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात चांगलीच चुरस पाहायला मिळली. अखेर त्याला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी २४.७५ कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले. त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. विषेश म्हणजे याच लिलावात एका तासापूर्वी म्हणजेच दुपारी २.३० वाजल्याच्या दरम्यान स्टार्कचा संघसहकारी पॅट कमिन्सला तब्बल २०.५० कोटी रुपयांची बोली लागली होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने संघात घेतले होते. त्यामुळे तो त्यावेळी सर्वात महागडा खेळडू ठरला होता. मात्र आता, त्याच्या याच विक्रमाला साधारण तासाभरात स्टार्कने मागे टाकले आहे. त्यामुळे आता स्टार्क आणि कमिन्स हे आयपीएल लिलावातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.