पसरणी घाटात भीषण वणवा…
सातारा (महेश पवार):
वाई ते पाचगणी जाणाऱ्या रस्त्यावर पसरणी घाटात मंगळवारी रात्री 9.30वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने वणवा लावला. या वणव्याने रौद्र रूप धारण केले होते. लागलेल्या वणव्यात वनसंपदा जळून खाक झाली. पसरणी घाटात मध्येच झाड पडले होते. वाई पालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी, शिवसह्याद्री करिअर अकॅडमीचे विद्यार्थी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वणवा आटोक्यात आणण्यासाठी आणि रस्त्यावर पडलेले झाड हटवण्यासाठी प्रयत्न केले.
पसरणी घाटात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने वणवा लावल्याचे बोलले जात असून यया लावलेल्या वणव्याने बघता बघता रौद्र रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगाने वणवा आपल्या कवेत कित्येक झाडे, वन्य प्राणी घेत भडकत होता. या वणव्यात मोठ्या प्रमाणात झाडे, वन्यजीव होरपळले. या वणव्यामुळे घाटातल्या एका झाडाने पेट घेऊन ते रस्त्यातच पडले होते.
वणव्याची माहिती मिळताच पर्यावरण प्रेमी, शिवसह्याद्री अकॅडमीचे विद्यार्थी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि वाई पालिकेचा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी वणवा लागलेल्या ठिकाणी व झाड पडलेल्या ठिकाणी पोहचून विझविण्यासाठी प्रयत्न करत होते. रात्री उशीरापर्यत वणवा सुरू होता.