अखेर चोराडे सोसायटीच्या ‘त्या’ रेशनिंग दुकानावर कारवाईचा बडगा…
पुसेसावळी (महेश पवार) :
खटाव तालुक्यातील चोराडे येथील विकास सेवा सोसायटी च्या रेशनिंग दुकानाची दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी पुरवठा निरीक्षकांनी तपासणी केली होती, तद्नंतर वडूज तहसीलदारांनी पुढील कारवाई साठी हे प्रकरण जिल्हा पुरवठा विभागाकडे वर्ग केले होते. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाच्या प्रमुख वैशाली राजमाने यांनी सदर दुकानाची अनामत रक्कम जप्त करून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे शिवाय फेरचौकशीचे आदेशही दिले.
याबाबत अधिक माहिती चोराडे येथील विकास सेवा सोसायटी च्या रेशनिंग दुकाना तील झालेल्या गहू व तांदळाच्या अपहाराबाबतच्या निकाल पत्रात जिल्हा पुरवठा अधिका ऱ्यांनी आदेशात रास्त भाव दुकानदार यांनी केलेला खुलासा अंशतः मान्य करणेत येत असून रास्त भाव दुकानाची १००% अनामत रक्कम जप्त करणेत येत आहे.रास्त भाव दुकानदार यांनी रास्त भाव दुकानात धान्य पोहोच झाले नसताना, आगाऊ पावत्या ई-पॉस मशीनवर काढले बाबत १० हजार रुपये इतका दंड करणेत येत आहे. तसेच भविष्यात अशी बाब निदर्शनास आलेस अथवा तपासणी मधील दोषांची पुनरावृत्ती होत असलचे निदर्शनास आलेस रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल अशी सक्त ताकीद रास्त भाव दुकानदार यांना देणेत येत आहे.
तरी तहसिलदार खटाव यांनी निकाल पत्रात नमूद मुद्दे विचारात घेवून चेअरमन, चोराडे, वि. का.स. सेवा सोसायटी, लि.चोराडे, ता. खटाव, जि. सातारा यांचेकडे पुरवठा निरिक्षक खटाव यांचे तपासणी दिनांका दिवशी ऑनलाईन प्रमाणे असणारा धान्य साठा, पुरवठा निरिक्षक खटाव यांचे तपासणीवेळी पंचनाम्यानुसार आढळून आलेला शिल्लक धान्य साठा यातील विसंगती बाबत रास्त भाव दुकानाची या आदेशाचे दिनांकापासून ०१ महिन्याचे आत फेर तपासणी करावी व अहवाल या कार्यालयास सादर करावा असे तहसिलदार खटाव यांना आदेशीत करणेत येत आहे.
तसेच तहसिलदार खटाव यांनी निकाल पत्रात नमूद केले नुसार,रास्त भाव दुकानात धान्य पोहोचले नसताना रास्त भाव दुकानदार यांना ई-पॉस मशीनवर पावत्या काढणेस सांगणे, रास्त भाव दुकानदार यांनी सुनावणीचे वेळी जो पेनड्राईव्ह सादर केला आहे, त्यामध्ये पुरवठा निरिक्षक व रास्त भाव दुकानदार यांचे संभाषण असणे, पुरवठा निरिक्षक खटाव यांनी रास्त भाव दुकानदार यांचे बरोबर या अनुषंगाने संशयास्पद संभाषण करणे ही बाब प्रशासकीय दृष्ट्या गंभीर आहे.या अनुषंगाने पुरवठा निरिक्षक खटाव यांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा घ्यावा व यामध्ये पुरवठा निरिक्षक दोषी आढळून येत असतील तर, सहपत्र १ ते ४ सह खाते अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावा असे तहसिलदार खटाव यांना आदेशीत करणेत येत आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करून रास्त भाव दुकानदार यांना विहित मार्गाने बजावून तो बजावलेबाबत आदेशाच्या दुसऱ्या प्रतीवर त्यांची स्वाक्षरी घेऊन आदेशीत केलेप्रमाणे कार्यवाही करावी, असा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे.
चोराडेतील सर्वसामान्य ग्राहकांना ऑक्टोंबर महिन्याचा माल नं देता नुसत्या पावत्या केल्या जात होत्या त्याची तक्रार दिल्या नंतर रेशनिंग दुकानाची तपासणी केली असता
गहू- ९३५६ किलो,तांदूळ -६८०६ किलो अशी मालाची तफावत आढळली होती, त्यामुळे हा माल नक्की गेला कुठे हा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला असून अपरातफर करणाऱ्या संबंधितावर कारवाई होणार का? हा प्रश्न गुलदत्यातच राहणार अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे.
..