
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे मनोमिलन; कार्यकर्ते मात्र संभ्रम अवस्थेत
सातारा (महेश पवार) :
साताऱ्याच्या राजघराण्यातील दोन्ही राजेंचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. या ना त्याकारणाने वारंवार एकमेकांवर टीका करणारे दोन्ही राजे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. दोन्ही राजांच्या वादाचं कारण हे पालिका निवडणूक असून आमदार शिवेंद्रराजे यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांचा पालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दोन्ही राजे मधील दरी वाढच गेली. एवढेच नव्हे तर कोजागिरी पौर्णिमा जवळ आली की सातारकरांना आणि कार्यकर्त्यांना सुरुची राडा आठवल्याशिवाय राहत नाही.
शिवेंद्रराजे जेव्हा भाजपात सामिल झाले तेव्हापासून दोन्ही राजे मधील धुसफूस सातारकरांना पहायला मिळतच होती मात्र जस जशी लोकसभा निवडणूक आली तशी उदयनराजे यांनी मन मोठं दाखवत नमती बाजू दाखवत कास च्या भूमिपूजनावेळी उदयनराजेंनी मी बसायला तैयार आहे ते बसणार का ? माझ्याबरोबर असा उलट सवाल उपस्थित केला मात्र यानंतर देखील दोन्ही राजे बाजार समितीच्या निवडणुकीवेळी आमनेसामने आलेच मात्र बाजार समितीच्या जागेवरून दोन्ही दोन्ही राजेंच्या मधील वाद विकोपाला गेला होता . यानंतर बाजार समितीचा निकाल शिवेंद्रसिंहराजे यांच्या बाजूने लागल्यानंतर उदयनराजेंनी नमती भूमिका घेतली.