TK Elevator स्थापित करते आणि नवीन बेंचमार्क्स
TK Elevator ही प्रतिष्ठित जर्मन मल्टीनॅशनल एलीव्हेटर कंपनी भारतातील गतीशीलता बाजारपेठेच्या डायनॅमिक्सचा स्वीकार करत उद्योगामध्ये नाविन्यता व विकास आणत आहे.
कंपनीची विकास गती, तसेच व्यावसायिक, रिटेल, सार्वजनिक पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि शैक्षणिक क्षेत्रांमधील दीर्घकालीन पाठिंब्यामधून स्थानिक बाजारपेठेप्रती त्यांची समर्पितता दिसून येते. भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असताना लक्झरीअस निवासी घरे व व्हिलाजसाठी मागणी वाढत आहे, ज्यामुळे TK Elevator या बाजारपेठेत प्रगती करण्याच्या अधिकाधिक संधी मिळाल्या आहेत.
भारतातील वाढत्या पायाभूत सुविधा व अर्थव्यवस्थेला सेवा देण्याप्रती TK Elevator अविरत कटिबद्धतेमुळे २०१७ मध्ये पुण्यातील चाकण येथे त्यांचे अत्याधुनिक आरअँडडी व उत्पादन प्लांट सुरू झाले. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी संलग्न राहत TK Elevator अनेक नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञान-केंद्रित उत्पादने आता स्थानिक स्तरावर उत्पादित केली जातात, ज्यामुळे त्यांना स्थानिक ग्राहकांच्या गरजा समजण्यासोबत त्यांना उत्तम सेवा देता येते.
TK Elevator भारतातील पायाभूत सुविधा विकासांमधील व्यापक सहभाग विविध क्षेत्रांशी निगडित आहे, ज्यामधून देशातील पसंतीची गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता म्हणून त्यांचे यश दिसून येते. आयआयसीसी (यशोभूमी) व आयईसीसी (भारत मंडपम) अशा प्रख्यात कन्व्हेंशन सेंटर्ससोबत सहयोग करण्यापासून उच्चस्तरीय व हाय-स्पीड प्रकल्प जसे हैदराबादमध्ये सास आयटॉवर, मुंबईमध्ये मॅरेथॉन फ्यूचर एक्स व रूपारेल एरियाना सुरू ठेवत TK Elevator भारतातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये आपली छाप निर्माण केली आहे. तसेच अनेक टाऊनशिप विकास प्रकल्प देखील आहेत, जसे बेंगळुरूमध्ये भारतीय सिटी, गुरगावमध्ये वाटिका आणि पुण्यामध्ये अमनोरा पार्क टाऊन.
याव्यतिरिक्त, कंपनीचा देशातील सर्वात मोठे डीएलएफ मॉल ऑफ इंडिया असे उल्लेखनीय मॉल्स, आयआयटी खडगपूर सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, पश्चिम बंगालमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल्स आणि सर्वात मोठे सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प जसे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (DIAL), बेंगळुरू, कोची, पुणे, गुवाहाटी व नोएडा एअरपोर्टस् आणि कोलकाता व पुणे मेट्रो यांच्यासोबत सहयोग आहे.
एलीव्हेटर्स, एस्केलेटर्स, मूव्हिंग वॉक्स, प्लॅटफॉर्म व स्टेअर लिफ्ट्स, होम लिफ्ट्स व एअरपोर्ट सोल्यूशन्स अशा कंपनीच्या वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उत्पादन ऑफरिंग्ज, तसेच त्यांचे प्रगत व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जसे TWIN, MAX व AGILE यांमुळे TK Elevator उद्योग अग्रणी म्हणून स्थान अधिक दृढ झाले आहे. भारतातील आर्थिक विकासाशी संलग्न राहत TK Elevator भारताच्या विकासाला गती देण्यासोबत भारताच्या भविष्याला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावत आहे.
” TK Elevator सर्वात महत्त्वूपर्ण बाजारपेठ भारताच्या विकासाप्रती योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यासाठी कंपनी अत्याधुनिक गतीशीलता सोल्यूशन्स प्रदान करत आहे आणि देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहे. आमचा भारतातील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करत राहण्याचा, तसेच व्यक्तींचे जीवन सुधारण्याचा मनसुबा आहे, ” असे TK Elevator इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनिष मेहन म्हणाले.