google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णांवर ‘या’मुळे होतोय विपरीत परिणाम’

मडगाव :
रूग्ण नोंदणी, रूग्णवाहिकांची कमतरता, रूग्णांकडून ऑनलाईन पेमेंट न स्वीकारणे आणि बेडची कमतरता या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी हॉस्पिसीयो दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांची भेट घेतली. “लाल फितीचा” कारभार हेच सर्व इस्पितळाच्या सर्व समस्यांचे कारण आहे असे माझे ठाम मत आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी याची त्वरित दखल घेऊन परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.

वैद्यकीय अधीक्षकांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभव नायक यांनी मी काही सूचना दिल्या असून, रुग्णांच्या अडचणी कमी करण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधीक्षकांनी दिले आहे असे स्पष्ट केले.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाकडे सध्या फक्त 2 रुग्णवाहिका आहेत. सदर रुग्णवाहिका हृदयविकाराच्या आणि नवजात बालकांच्या रुग्णांसाठी दिल्या वापरल्या जात आहेत. अपघाती रुग्णांसह इतर सर्व रुग्णांना 108 रुग्णवाहिकेद्वारेच नेले जाते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ताबडतोब दोन रुग्णवाहिका देण्याचे तसेच इतर काहिजणांनी अशाच रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केले होते, परंतू, आतापर्यंत एकही नवीन रुग्णवाहिका इस्पितळाकडे आलेली नसल्याचे समजते, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.

वैद्यकीय अधीक्षकांनी मला ओपीडीमध्ये सुरू असलेली व्यवस्था समजावून सांगितली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती महिलांना ओपीडीमध्ये थेट प्रवेश दिला जातो. ज्येष्ठ नागरिक आणि इतर रुग्णांसाठी बसण्यासाठी लॉबीमध्ये जवळपास 300 खुर्च्या उपलब्ध आहेत. रुग्ण आणि नातेवाईक तपासणी होणार नाही का या चिंतेने घाबरून गर्दी करतात. यावर तोडगा काढण्यासाठी इस्पितळ प्रशासनाकडून दखल घेतली जाईल, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रुग्णांकडून ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नाही, ही धक्कादायक बाब आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तातडीने फाइल क्लिअर करून ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू करावी, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली.

हॉस्पिसिओ हॉस्पिटलमध्ये खाटांच्या तीव्र टंचाईमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी मला समजल्या आहेत. आता फक्त 350 खाटा आहेत आणि सुमारे 150 खाटांची तातडीची गरज आहे. त्याच बरोबर आवश्यक मनुष्यबळ देणे सरकारचे कर्तव्य आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित व्हावे यासाठी तसेच सदर इस्पितळाला टर्शियरी इस्पितळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी सर्वांच्या सहकार्याने मी सरकार दरबारी पाठपूरावा करीत राहिन, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!