रविचंद्रन अश्विनचा आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
टीम इंडियाचा खेळाडू आर अश्विन याने तिसर्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराउंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.
अश्विनने आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. अश्विनने मालिकेदरम्यान एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. अश्विनच्या या निर्णयासह त्याच्या 13 वर्षीय क्रिकेट कारकीर्दीचा अंत झाला आहे. टीम इंडियसाठी गेली कित्येक वर्ष सेवा करणाऱ्या या खेळाडूला निरोपही देता न आल्याची खंत यामुळे व्यक्त केली जात आहे.