
बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी
महाबळेश्वर (महेश पवार) :
पुणे महाबळेश्वर बस मध्ये बंदुकीची गोळी सापडल्यामुळे पाचगणी बस स्थानकात एकच खळबळ उडाली.पाचगणी पोलिसांनी बंदुकीची गोळी ताब्यात घेत त्या अनुषंगाने तपास सुरु केली आहे.
पुणे महाबळेश्वर एसटी बस क्रमांक(एमच१४बीटी १२४४) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाचगणी बस स्थानक का आली. यावेळी प्रवाशांना बसमध्ये बंदुकीची गोळी दिसून आली. प्रवाशांनी तात्काळ वाहक धोत्रे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली .याबाबत पाचगणी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी चालक व वाहका कडून बस मध्ये कोण प्रवासी कोणत्या वर्णनाचे पुण्यापासून बसले होते. प्रवासा दरम्यान उतरले, पाचगणीमध्ये उतरले आहेत याची माहिती घेतली. पोलिसांनी ही बंदुकीची गोळी ताब्यात घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश पवार करीत आहेत.