‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या पश्विम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी पत्रकार , लेखक अभयकुमार देशमुख
सातारा:
महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पत्रकार , लेखक अभयकुमार देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला यांच्या हस्ते अभयकुमार देशमुख यांना मुंबई कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले.
व्हाईस ऑफ मीडिया ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना असून भारतातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे.
कोरोनाकाळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ने या १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले.
पत्रकारांची हीत जपणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहिले जाते. राजकारणामध्ये न अडकता पत्रकारिता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून घडत आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची घरे उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.
या संघटनेच्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्हा आणि तालुका स्तरावरील निवडी लवकरच पार पडणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र नवनियुक्त अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांनी सांगितले.