google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इतिहासाची पुस्तके वाचावीत : अमित पाटकर

पणजी :

सनबर्नसारख्या ‘ड्रग फेस्टिव्हल’ला गोव्याला जागतिक मान्यता मिळाल्याचे श्रेय शाखा प्रशिक्षित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी पुन्हा एकदा डॉ. प्रमोद सावंत यांना मूर्खपणाची विधाने करण्यापूर्वी इतिहासाची पुस्तके वाचण्याचे आवाहन करतो, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला   आहे.


निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण आणि गोव्याच्या विकासात काँग्रेसचे योगदान नाही, या केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपला गोव्यातील माफियांचे प्रवर्तक म्हटले आहे.


गोव्यात चोगम रिट्रीट 1983 साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारने आयोजित केल्याने  गोव्याला जागतिक क्षितिजावर नेले. गोव्याची संस्कृती आणि वारसा यांना जागतिक ओळख आहे. भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहपाठ करून सनबर्न फेस्टिव्हलसारख्या ड्रग फेस्टिव्हलना श्रेय देणे बंद करावे, असे अमित पाटकर म्हणाले.


केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी हे जाणून घेतले पाहिजे की 2012 मध्ये गोव्याच्या पतनाची सुरुवात भाजपने मागच्या दरवाजाने सत्ता काबीज केल्यानंतर झाली. भाजपने आमच्या प्रत्येक इंच जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या माफियांना प्रोत्साहन दिले. म्हादईची तडजोड, खाण बंदी आणि पर्यटन संपवणे , मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रूपांतरण, सर्वाधिक बेरोजगारी, मिशन टोटल कमिशन, गोवा क्राइम डेस्टिनेशन बनवणे हे डबल इंजिन सरकारचे योगदान आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी  केला आहे.

काँग्रेस पक्षाने नेहमीच गोमंतकीयांच्या भावनांचा आदर केला आणि गोवा मुक्तीपासून ते घटकराज्य पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात योगदान दिले. काँग्रेसने पूल, जीएमसी इस्पितळ प्रकल्प, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, रवींद्र भवन, केंद्रीय ग्रंथालय, गोवा विद्यापीठ आणि इतर विविध प्रकल्प बांधले. आम्ही पर्यावरण, वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करून विकास घडवून आणला, असे अमित पाटकर म्हणाले.

निती आयोगाच्या बैठकीत खोटी आणि दिशाभूल करणारी वस्तुस्थिती मांडल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक प्रचार सभेचे ठिकाण सांकवाळ येथील उघड्यावर शौचाच्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर होते, परंतु मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात गोवा हे हागणदारी मुक्त असल्याचा दावा केला आहे, हा विनोद आहे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

गोवा राज्य आता “गुन्हे, जमीन हडप, भ्रष्टाचार, वेश्याव्यवसाय, जुगार, कॅसिनो” मध्ये स्वयंपूर्ण झाले आहे. सदर काळ्या धंद्यातील लोकांना भाजप सरकारचे संरक्षण आहे. भाजपने गोव्यात सर्वाधिक जमीन रुपांतरीत करण्याचा विक्रम केला आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!