देशाची पंच्याहत्तरी आणि मुस्लिमांचे प्रतिनिधित्व…
– अस्लम जमादार
आम्ही सर्व भारतीय भारताचा ७५ अर्थात “अमृत महोत्सवी” दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत . भारताच्या ह्या ७५ वर्षातील जडणघडणी साठी कोण्या एका धर्म / पंथ व राजकीय पक्ष ह्यांचे योगदान न्हवे तर सर्वांची एक जूट अर्थात टीम वर्क ह्या मुळेच भारताने आंतरराषट्रीय स्तरावर नेहमीच आपले नाव उंच स्तरावर नेले आहे. भारतीय नागरिकांनी देखील धर्म , जात , पंथ न पाहता सामाजिक ,राजकीय ,क्रीडा व चित्रपट क्षेत्रातून अनेक मुस्लिम व्यक्तींना यशाच्या शिखरावर नेल्याचे दिसून येते.
परंतु अलीकडील काळात अल्पसंख्यांक ह्यांना भीतीची भावना मनात निर्माण होऊन आपण ह्या सर्व पासून वेगळे अर्थात परकेपणाची भावना निर्माण होऊ लागली आहे हे जगात सर्वात मोठ्या असलेल्या लोकशाही भारताला निश्चित अभिमानाची बाब नसावी असे खेदाने म्हणावे लागते.
असे असले तरी भारतीय जनता अथवा जातीने मुस्लिम धर्मात जन्माला येऊन देखील स्वतःला भारतीय समजून योगदान देणारे अनेक आहेत ज्यांचा उल्लेख आणि गौरव ह्या दिनी करणे उचित असे ठरेल.
भारताच्या राजकारणातील सर्वोच्च पद हे राष्ट्रपती. आज पर्यंत विराजमान झालेल्या १५ राष्ट्रपती पदांमध्ये श्री झाकीर हुसेन ( १३ मे १९६७- ३ मे 1969 ) फक्रुद्दीन अली अहमद (२४ ऑगस्ट १९७४-११ फेब १९७७ ) आणि सर्वांचे लाडके आणि चाहते असे डॉ A P J कलाम ( २५ जुलै २००२-२५ जुलै २००७ ) असे तीन मुस्लिम समाजातील राष्ट्रपती पदी विराजमान झाले गमत म्हणजे हे प्रमाण २०% असावे हा लोकसंख्येच्या प्रमाणात चमत्कारच न्हवे का ?
भारताच्या नाव लौकिक वाढविण्यासाठी नेहमीच आंतरराषट्रीय खेळ मध्ये क्रिकेट आणि हॉकी हे खेळ महत्वाचे ठरले गेले आहेत . मुस्लिम समाजात जन्मला आलेले मोहंमद अझरुद्दीन ह्यांची पदार्पणात शतकाची हॅट्ट्रिक कोण बरे विसरेल तसेच त्यांची खेळी आजही ५० शि तील पिढी प्रत्यक्ष खेळ विसरू शकत नाही त्यांच्या शिवाय इतर ह्यांनी मोलाची आणि नेहमीच महत्वपूर्ण खेळी करत भारताचे नाव अंतरराष्रीय स्तरावर उंचावले आहे हे आम्ही भारतीय क्रिकेट प्रेमी कसे बरे विसरू शकतो ?
भारतीय संघामध्ये कर्णधार होण्याचा प्रथम मान मुस्लिम म्हणून इफ्तिकार अली खान पत्तोडी ह्यांच्या नावावर नोंदविला जातो एक उत्कृष्ट क्रिकेट च न्हवे तर हॉकी पट्टी म्हणून ते नावाजले दुर्देवाने पुत्र मन्सूर अली खान पत्तोडी ह्याच्या ११ व्य वाढदिवशी अकाली मृत्यू यावा हे दुर्देवच म्हणावे लागेल.
दुसरा मुस्लिम म्हणून भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा मान गुलाम अहमद ह्यांच्या कडे जातो १९४८-४९ च्या विंडीज दौऱ्यात त्यांनी पदार्पण करताना जागतिक ऑफ स्पिनर म्हणून ख्याती मिळवली. गुलाम मोहंमद , अमीर इलाही आणि अब्दूर हाफिज करदार हे त्रिकुट ह्यांना भारतीय आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशाकडून खेळण्याची अनोखी संधी मिळाली आणि अशी खेळी खेळणारे असा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला जो कधीही मोडला जाणार नाही.
भारत पाक फाळणीनंतर मात्र अब्दूर हाफिज करदार हे नवनिर्वाचित पाक संघाचे पहिले कर्णधार ठरले
अशा प्रकारे अनेक मुस्लिम जे भारतीय म्हणून आपला ठसा उमटविला त्यांना भारतीय प्रेक्षकांनी त्यांचा धर्म जात न पाहता नेहमी आदर , आणि आपले हिरो म्हणून आपलेसे केले.
राजकारण , खेळ ह्यानंतर भारतीयांनी नेहमीच चित्रपट क्षेत्राला प्राधान्य दिले आहे . ह्या क्षेत्राने गेल्या ७५ वर्षाच्या काळात अनेक सामाजिक / राजकीय / ऐतिहासिक घटना डोळ्यासमोर ठेवून प्रोबोधनात्मक संदेश देत महत्वाचे योगदान देत राहिले आहेत
विश्वास बसेल अथवा नाही मुस्लिम समाजाचा ह्या क्षेत्रात नायक /नायिका / खलनायक / लेखक /म्हणून नेहमीच वरचष्मा राहिला आहे हे कोणीही मान्य करेल.
ह्यातील अनेकांनी आपली खरी नावे बाजूला ठेवत “हिंदू” नाव ग्रहण करत चित्रपट क्षेत्रात अजरामर यश प्राप्त केले ज्याने ते मुस्लिम आहेत ह्यावर आज कित्येक जणांना विश्वास बसत नाही
ह्यात सर्वात प्रथम दिलीपकुमार ( मोहंमद युसूफ खान ) ह्यांना कोण बरे विसरू शकेल १९४४ भारत स्वतंत्र होण्या पूर्वी पासून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली.
त्यांच्या काळातील नायिका मीना कुमारी ( मेहजबीन बानो ) , मधुबाला ( मुमताज जेहान देहलवी ) ह्या मुस्लिम असून हि प्रचंड यश मिळवत होत्या . कुटुंबातून मिळणारी परवानगी आणि अभिनय हा आजच्या धर्मांध मुस्लिमाना अभ्यासाचा विषय बनू शकेल ?
त्या नंतर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकणारे जगदीप ( सय्यद इश्तियाक अहमद जाफरी ) असो कि अजित (हमीद अली खान ) जॉनी वॉकर ( बद्रुद्दीन जमालुद्दीन काजी ) हे जन्माने मुस्लिम होते ह्या वर आज हि विश्वास बसत नाही.
एकमात्र खरे मुस्लिम असून हे सर्व हिरो , खलनायक , विनोदी ,दुय्यम भूमिकेतून मोठे यश संपादन करत होते आणि रसिक देखील त्यांच्या ह्या यशाला प्रोत्साहन देत होते ह्या मध्ये त्या मुस्लिम आहेत म्हणून कोणालाही ठोकताळे गेले नाही हि बाब गंभीरतेने घेणे गरजेचे वाटते असे मला म्हणावे लागेल
बॉलिवूड मधील तब्बल ३०% हुन अधिक सेलिब्रिटीएस हे मुस्लिम ज्यांनी उत्तुंग यश संपादन करत सर्वाना आपलेसे केले आहे हे स्वातंत्र्य काळा नंतरची मोठी घटना ह्या आजच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहली गेली नाही तर नवल ते काय ?
सलीम खान लिखित शोले ने सर्व विक्रम इतिहास जमा करत नवा विक्रम केला होता . ह्या सलीम खान ने शोले बरोबर दिवार , अनेक हिट चित्रपट आम्हा रसिकांना दिले ते आज हि संस्मरनी आहेत ह्या चित्रपटाद्वारे अमजद खान हा दिग्दर्शक ऐवजी गब्बर म्हणून खलनायक सर्वांच्या घर घर मध्ये जाऊन बसला . जन्माने मुस्लिम असलेला खरा गब्बर हा एक दिलदार माणूस होता हे फार क्वचित जनानं कल्पना असेल , वयाच्या केवळ ५१ व्य वर्षी त्याला मृत्यनं घालावे हे आम्हा प्रेक्षकांचे दुर्भाग्य असेच न्हणावे लागेल.
सलीम खान चे पुत्र सलमान खान ह्याने मात्र आपल्या वडील पेक्षा अधिक यश आपल्या अभिनयाने संपादन करत तब्ब्ल 3 दशके सर्वांची मने जिंकत स्वतः मात्र अविवाहित राहत अनेक प्रसंगांना वादात राहत प्रेक्षकांचा एका वेगळा वर्ग निर्माण करत सुपरस्टार म्हणून तरुणानं नेहमीच आकर्षित करत राहिला सलमान बरोबरच शाहरुख / आमिर ह्या खान मंडळी देखील अभिनयाने ह्या चित्रपट क्षेत्रात एक वेगळा आपला चाहता निर्माण करत दैदीपमान यश संपादन केले आहे .
विशेषतः कोरोनाच्या काळात इरफान खान ह्यांच्या मृत्यूने सर्वांना जात जाता जिंकले हे आम्ही लाखो लोकानी पहिले आहे.
मराठी म्हणून अभिमान असणारे महाराष्ट्रातील डॉ जब्बार पटेल ह्यांनी देखील वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असले तरी नाट्य चित्रपट क्षेत्रातून सामना / सिहांसन जो ठसा उमटविला आहे तो आम्ही मराठी माणूस कधीच विसरू शकत नाही. तसेच डॉ यु म पठाण ह्यांचे संत साहित्य ह्यावरील त्यांचा गाढा अभ्यास थक्क करणारा आहे.
थोडक्यात जन्मला मुस्लिम असून त्यांच्या यशात कुठलाही अडसर त्यांना कधीच आला नाही त्यांच्या लाखो चाहत्यांनी मुस्लिम म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून सदैव त्यांना हृदयात स्थान दिले आहे हे निशचित अभिमानाची अशीच बाब म्हणावी लागेल.
आजच्या अमृत महोत्सवी निमित्ताने मुस्लिम असो इतर सर्वानी जात धर्म पंथ या बंधनात गुंतायचं कि आपल्या बुद्धी कौशल्यावर यश सिद्धी साठी पुढे सरकायचे हाच मोठा यक्षप्रश्न येणाऱ्या शतक महोत्सवी अर्थात पुढील २५ वर्षासाठी आजच्या तरुण पिढी साठी असणार आहे बघा पटतय का ? विविध क्षेत्रातून आपली बहुमोल कामगिरी दाखविणे हे एक मोठे आव्हान असणार आहे . बघा पटतंय का ?
( लेखक मुस्लिम समाजाचे अभ्यासक आणि अल्पसंख्यानक शैक्षणिक चळवळीचे संस्थापक आहेत.)