विश्वचषकात तब्बल ३०९ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास…
विश्वचषक २०२३च्या २४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत आठ गडी बाद ३९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २१ षटकांत ९० धावांत गारद झाला.
कांगारू संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन केला. या विजयाने त्यांचा नेट रनरेट खूप मजबूत झाला आहे.
Australia register the largest victory by runs in the history of the Cricket World Cup. #AUSvNED | #CWC23 | 📝: https://t.co/PWnTqfNey8 pic.twitter.com/GwizCvWydo
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 25, 2023
ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सचा वाईट पराभव केला. त्यांनी ३०९ धावांनी मोठा विजय मिळवला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा स्वतःचाच विक्रम मोडला. २०१५ मध्ये पर्थमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध २७५ धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारताच्या नावावर आहे. २०२३ मध्ये तिरुअनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध ३१७ धावांनी विजय मिळवला होता.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत आठ गडी बाद ३९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ २१ षटकांत ९० धावांत गारद झाला. कांगारू संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन केला.