अर्थमत/ टेक्नॉलॉजी

अ‍ॅक्सिस बँकेच्या नफ्यात ३८ टक्के वाढ

दुसऱ्या तिमाहीत ₹७,००३ कोटींचा नफा

मुंबई : अ‍ॅक्सिस बँकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर २०२६) ७,००३ कोटी रुपयांचा करपश्चात नफा नोंदवला. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ३८ टक्के वाढ झाली आहे. निव्वळ व्याज उत्पन्नातील वाढ आणि अनुत्पादित मालमत्तेच्या प्रमाणात झालेली घट यामुळे बँकेच्या आर्थिक कामगिरीला बळ मिळाले.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक १२ टक्क्यांनी वाढून १५,३७१ कोटी रुपयांवर पोहोचले. मुख्य परिचालन नफ्यात ११ टक्के वाढ होऊन तो १०,९९८ कोटी रुपये झाला. सप्टेंबरअखेर बँकेच्या एकूण ठेवींमध्ये वार्षिक २१ टक्के, तर कर्जवाटपात २३ टक्के वाढ झाली. बँकेचा एकूण ताळेबंद २२ टक्क्यांनी वाढून २०.४६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला.

अनुत्पादित मालमत्तेत घट

बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. एकूण अनुत्पादित मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण गेल्या वर्षीच्या १.४६ टक्क्यांवरून १.१६ टक्क्यांपर्यंत खाली आले. निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचे (नेट एनपीए) प्रमाणही ०.४४ टक्क्यांवरून ०.३५ टक्क्यांवर आले.

कॉर्पोरेट आणि एसएमई कर्जवाटपात वाढ

कॉर्पोरेट कर्जवाटपात वार्षिक ३४ टक्के वाढ झाली. लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) दिलेल्या कर्जात २५ टक्के वाढ होऊन हा व्यवसाय १,६४,५९२ कोटी रुपयांवर पोहोचला. लघु व्यवसाय बँकिंगमध्ये २१ टक्के, तर ग्रामीण कर्जवाटपात २० टक्के वाढ झाली.

बँकेचे शुल्काधारित उत्पन्न सहा टक्क्यांनी वाढून ६,३८१ कोटी रुपये झाले. बँकेच्या देशांतर्गत उपकंपन्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १,२१० कोटी रुपयांचा एकत्रित करपश्चात नफा नोंदवला. त्यात वार्षिक २९ टक्के वाढ झाली.

डिजिटल व्यवहारांचा विस्तार

यूपीआय पेमेंट सेवा पुरवठादारांच्या विभागात व्यवहारांच्या संख्येनुसार बँकेचा बाजारहिस्सा सुमारे ३८ टक्के असल्याचा दावा बँकेने केला आहे. यूपीआय व्यवहारांच्या एकूण मूल्यामध्ये वार्षिक ३४ टक्के वाढ झाली. तिमाहीत बँकेने सुमारे १०.९ लाख नवीन क्रेडिट कार्ड जारी केली. सक्रिय क्रेडिट कार्डांच्या संख्येनुसार बँकेचा बाजारहिस्सा सुमारे १३.१ टक्के होता.

बँकेच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक ग्राहकांनी केलेल्या एकूण आर्थिक व्यवहारांपैकी ९८ टक्के व्यवहार डिजिटल माध्यमातून झाले. अ‍ॅक्सिस मोबाइल ॲपचे मासिक सक्रिय वापरकर्ते सुमारे १.६ कोटी असून, त्यापैकी बँकेचे ग्राहक नसलेले सुमारे १.२ कोटी वापरकर्ते आहेत.

या तिमाहीत अ‍ॅक्सिस बँकेने मास्टरकार्ड आणि व्हिसा नेटवर्कवरील क्रेडिट कार्डधारकांसाठी ॲपल पे सेवा सुरू केली. ही सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली बँक असल्याचा दावा बँकेने केला आहे. तसेच, Scapia आणि MakeMyTrip यांच्याबरोबर भागीदारी केली. Hitachi Payment Services च्या सहकार्याने डिजिटल बँकिंग आणि एआय साउंडबॉक्सशी संबंधित सुविधाही सुरू करण्यात आल्या.

ग्राहकसेवा आणि क्रीडा क्षेत्रात उपक्रम

ग्राहकांशी संवाद वाढवण्यासाठी बँकेने ‘स्पर्श वीक २०२६’ हा उपक्रम सुरू केला. परदेशात शिक्षण घेतलेल्या भारतीयांना देशात

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!